गर्भपातादरम्यान महिलेचा मृत्यू

By Admin | Updated: November 4, 2015 22:41 IST2015-11-04T22:32:26+5:302015-11-04T22:41:51+5:30

डॉक्टरांविरुद्ध गुन्हा : सहारानगर येथील रुग्णालयातील प्रकार

Female death during miscarriage | गर्भपातादरम्यान महिलेचा मृत्यू

गर्भपातादरम्यान महिलेचा मृत्यू

नाशिक : असुरक्षितरीत्या गर्भपात करताना विडी कामगारनगरमधील विवाहितेचा गर्भपातादरम्यान मृत्यू झाला़ या प्रकरणी विवाहितेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीनुसार मखमलाबादरोड सहारानगर येथील शांतीनिवास येथील डॉ़ शरद लोहार यांच्यावर पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़
आकाशदीप भीमराव गायकवाड (२९, रा़ घर नं़ ६७४, विडी कामगारनगर, अमृतधाम, पंचवटी) व त्यांची पत्नी दीपाली यांना मूल नको असल्याने ते गर्भपातासाठी आमले हॉस्पिटलमध्ये गेले़ मात्र याठिकाणी खर्च अधिक सांगितल्याने ते माघारी फिरले़ दरम्यान, या दोघांना डॉ़ लोहार हे कमी पैशात गर्भपात करून देत असल्याची माहिती मिळाली़ त्यानुसार गायकवाड दाम्पत्य २१ आॅक्टोबरला डॉ़ शरद लोहार यांच्या मखमलाबाद रोडवरील शांतीनिवास येथे गेले़ या ठिकाणी डॉ़ लोहार यांनी घरीच असुरक्षितरीत्या गर्भपात करण्याच्या प्रयत्नात रक्तस्त्राव होऊन पत्नी दीपालीचा मृत्यू झाल्याची फिर्याद आकाशदीप गायकवाड यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दिली आहे़ या प्रकरणाचा अधिक तपास पंचवटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक देवरे करीत आहेत़ (प्रतिनिधी)

Web Title: Female death during miscarriage