शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ६३ लोकांविरुध्द गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 18:38 IST

शहरात सुदैवाने अद्याप कोरोना संशयितांचे नमुने तपासणी अहवाल निगेटिव्ह प्राप्त होत आहेत, मात्र संशयितांची संख्याही अलीकडे वाढत असल्याने प्रशासनाची चिंताही वाढली आहे. राज्यात कोरोनासंक्रमित रुग्णांचा आकडा ८९वर पोहोचला आहे.

ठळक मुद्देसुमारे ९४३ आस्थापनांविरुद्ध पोलिसांनी कायदेशीर कारवाई रविवारी रात्रीची संचारबंदी मोडणा-या ६३ लोकांविरुध्द पोलिसांनी गुन्हे

नाशिक : कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शहरासह जिल्ह्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार पोलीस आयुक्तालय हद्दीत विविध पोलीस ठाण्यांतर्गत ज्या व्यावसायिकांकडे गर्दी होण्याची शक्यता आहे, अशा लोकांना पोलिसांकडून सातत्याने नोटिसांद्वारे गर्दी टाळण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. मागील तीन दिवसांत आयुक्तालय हद्दीत ९४३ आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच साथरोग प्रतिबंधक व संचारबंदी कायद्याचे उल्लंघन करणा-या एकूण २२६ लोकांवर गुन्हे दाखल केले गेले आहेत. यामध्ये रविवारी रात्रीची संचारबंदी मोडणा-या एकूण ६३ लोकांविरुध्द पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.शहरात सुदैवाने अद्याप कोरोना संशयितांचे नमुने तपासणी अहवाल निगेटिव्ह प्राप्त होत आहेत, मात्र संशयितांची संख्याही अलीकडे वाढत असल्याने प्रशासनाची चिंताही वाढली आहे. राज्यात कोरोनासंक्रमित रुग्णांचा आकडा ८९वर पोहोचला आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासन, महापालिका, जिल्हा परिषद अशा सर्वच शासकीय यंत्रणा युद्धपातळीवर राबत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाकडूनसुद्धा अधिक खबरदारी घेतली जात आहे. राज्यात रविवारी (दि.२२) मध्यरात्री कलम १४४ नुसार जमावबंदी आदेशदेखील लागू केला गेला आहे. गर्दीला कारणीभूत ठरणा-या व्यावसायिकांवर (जीवनावश्यक वस्तू विक्री वगळता) गुन्हे दाखल केले जात आहेत. शहरातील मनाई आदेशाचे उल्लंघन करणा-या अशा सुमारे ९४३ आस्थापनांविरुद्ध पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. यामध्ये कापड दुकानदार, हॉटेलचालक, वॉइन शॉप, देशी दारू दुकाने, पानटपरीचालकांचा समावेश आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसVishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटील