पोलीस दलातर्फे महिलांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 17:46 IST2019-02-04T17:45:35+5:302019-02-04T17:46:21+5:30

मालेगाव  शहर पोलीस ठाणे सुसंवाद हॉल येथे ग्रामीण पोलीस व पोलीस सखीमंच यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी ‘सामाजिक जाणीवांचे भान हेच संक्रांतीचे वाण’ या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी विजयालक्ष्मी अहिरे होत्या.

 Felicitations by the police force | पोलीस दलातर्फे महिलांचा सत्कार

पोलीस दलातर्फे महिलांचा सत्कार

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल, उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले उपस्थित होते. नगरसेविका जिजाबाई बच्छाव, आशा आहेर, कविता कासलीवाल, सरोज देवरे, जान्हवी संघवी, अ‍ॅड. कल्पना जाधव, अ‍ॅड. गितांजली बाफना, शोभा सुमराव, कांता भोसले, उपअधीक्षक पूनम राऊत, तृष्णा गोपनारायण, पिंकी मेहता, अनिता अवस्थी, अंजली हेडा, सुचीता सोनवणे, शिल्पा देशमुख, छाया शेवाळे, जयश्री बच्छाव, दीपिका आहेर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. यामध्ये विविध क्षेत्रामधील महिलांचा सत्कार करण्यात आला.  विजेता बेसबॉल संघ मनीषा पगार, सामान्य रुग्णालयातील वर्ग १च्या कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. शुभांगी अहिरे, श्रीमती ज्योती जाधव यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचलन पिंकी मेहता यांनी केले. कार्यक्रमास पोलीस कर्मचारी व विविध क्षेत्रातील महिला उपस्थित होत्या. हळदी कुंकुवाचे वाण म्हणून स्वच्छ मालेगाव सुंदर मालेगावसाठी प्रत्येक महिलेला डस्टबिन देण्यात आले.

Web Title:  Felicitations by the police force