सनदी लेखापाल पदवीधारकांचा सत्कार

By Admin | Updated: March 8, 2016 00:18 IST2016-03-07T23:32:19+5:302016-03-08T00:18:11+5:30

सनदी लेखापाल पदवीधारकांचा सत्कार

Felicitated Chancellor Accountant Graduates | सनदी लेखापाल पदवीधारकांचा सत्कार

सनदी लेखापाल पदवीधारकांचा सत्कार

 नाशिक : इन्स्टिट्यूट नाशिक शाखेच्या वतीने २०१५ साली सनदी लेखापालाची पदवी प्राप्त केलेल्या सनदी लेखापालांचा सत्कार करण्यात आला.
आयसीए भवनामध्ये आयोजित कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सीए इन्स्टिट्यूटचे अखिल भारतीय उपाध्यक्ष नीलेश विकमसे
उपस्थित होते. यावेळी विकमसे म्हणाले, भविष्यात रोजगाराच्या विविध संधी निर्माण होण्यासाठी व
सनदी लेखापालांच्या हितासाठी
आंतरराष्ट्रीय स्तरावर आय. सी. ए. आय. प्रयत्नशील आहे.
दरम्यान, सनदी लेखापालाची पदवी प्राप्त १२० विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी आयसीएआय मध्यवर्ती परिषदेचे सदस्य सनदी लेखापाल प्रफुल्ल छाजेड, मंगेश किनारे, पश्चिम परिषदचे विक्र ांत कुलकर्णी उपस्थित होते.
प्रास्ताविक अध्यक्ष रवि राठी यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Felicitated Chancellor Accountant Graduates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.