छावण्यांना मुबलक चारा, पाणी मिळण्यासाठी पालकमंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 17:36 IST2019-07-01T17:36:15+5:302019-07-01T17:36:49+5:30
सिन्नर : शासनामार्फत तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या चारा छावण्यांना मुबलक पाणी व चारा देण्याची मागणी भाजपा भटके विमुक्त आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय गोसावी यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

छावण्यांना मुबलक चारा, पाणी मिळण्यासाठी पालकमंत्र्यांना साकडे
तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गुळवंच, आडवाडी व खापराळे येथे चारा छावण्या सुरू केल्या आहेत. या चारा छावण्यांमधील जनावरांना मुबलक चारा व पाणी देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळावा तसेच तालुक्यातील रस्ते लवकरात लवकर दुरूस्ती करून वाहनधारकांची गैरसोय दूर करण्याची मागणीही त्यांनी केली.