लॉकडाऊनच्या धास्तीने भाजीपाल्याचे दर कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 00:45 IST2021-03-16T21:24:28+5:302021-03-17T00:45:08+5:30
मानोरी : सर्वत्र कोरोना रुग्णांची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून मागील काही दिवसांपासून लॉकडाऊन होणार अशी चर्चा जोरात रंगू लागली असून लॉकडाऊनच्या या चर्चेने भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे.

लॉकडाऊनच्या धास्तीने भाजीपाल्याचे दर कोसळले
मानोरी : सर्वत्र कोरोना रुग्णांची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून मागील काही दिवसांपासून लॉकडाऊन होणार अशी चर्चा जोरात रंगू लागली असून लॉकडाऊनच्या या चर्चेने भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे.
कांद्याच्या दरात देखील सातत्याने घसरण होत असून दर घसरणीमुळे सर्व सामान्य शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी भाजीपाल्यात जनावरे सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. भाजीपाल्यातून उत्पादन खर्च फिटणे देखील दुरापास्त झाले असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
कोरोना संसर्ग पुन्हा वाढू लागल्याने प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक केल्याने ग्रामीण भागात खबरदारी म्हणून आठवडे बाजार बंद करण्यात आले आहेत. आठवडे बाजार बंद केल्याने शेतकऱ्यांना आपला भाजीपाला विक्रीस कोठे न्यावा, असा मोठा प्रश्न निर्माण झाला असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांवर घरोघरी जाऊन आपला भाजीपाला विकण्याची नामुष्की ओढवली आहे. आठवडे बाजार भरत नसल्याने भाजीपाल्याला मागणी वाढेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती.
दरम्यान ४ हजार रुपये प्रति क्विंटल दराने विकला जाणाऱ्या कांद्याच्या दरात देखील कमालीची घसरण सुरू असून मागील काही दिवसांपासून बाजार समित्यांत कांद्याला प्रति क्विंटल १ हजार पर्यंत भाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.