ऐतिहासिक गढी नामशेष होण्याची भीती

By Admin | Updated: June 11, 2017 00:29 IST2017-06-11T00:29:44+5:302017-06-11T00:29:56+5:30

नाशिक : प्राचीन काजीची गढी ही जुनी गढी म्हणून भारतीय पुरातत्त्व विभागाने संरक्षित वास्तू म्हणून घोषित केली आहे

Fear of the historic fortress extinction | ऐतिहासिक गढी नामशेष होण्याची भीती

ऐतिहासिक गढी नामशेष होण्याची भीती

 अझहर शेख।
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : प्राचीन काजीची गढी ही जुनी गढी म्हणून भारतीय पुरातत्त्व विभागाने संरक्षित वास्तू म्हणून घोषित केली आहे; मात्र या वास्तूच्या संरक्षणासाठी कु ठल्याही पातळीवर पुरातत्त्व विभागाकडून प्रयत्न होताना दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ताम्रपाषाणयुगाची साक्षीदार असलेल्या गढीच्या संवर्धनाकडे काणाडोळा केला जात आहे. एकूणच गढीवासीयांसह गढीलादेखील संरक्षणाची प्रतीक्षा वर्षानुवर्षांपासून कायम आहे.
मागील अनेक वर्षांपासून भारतीय पुरातत्त्व विभागाची संरक्षित वास्तू असलेली ऐतिहासिक प्राचीन मातीची जुनी गढी अर्थात काजी गढीच्या तळाशी प्राचीन काळी ताम्रपाषाण युगातील नागरी वस्ती असावी, असा अंदाज वेळोवेळी झालेल्या उत्खननामधून संबंधित तज्ज्ञांनी नोंदीद्वारे दर्शविला आहे. या गढीवर मोठ्या प्रमाणात लोकांची वस्ती असून, गढी निम्म्यापेक्षाही अधिक ढासळली आहे. दरवर्षी पावसाळ्यात गढी क ोसळत असल्याने प्राचीन संरक्षित वास्तूची माती होत आहे. काही संस्कृतींचा प्राचीन इतिहास नाशिकच्या गोदाकाठी आहे. गोदाकाठालगत विविध युगांमध्ये मानवी अधिवास असल्याच्या खाणाखुणा भारतीय पुरातत्त्व विभागाने वेळोवेळी गढीच्या उत्खननातून शोधण्यास यश मिळविले असले तरी या गढीच्या संरक्षणासाठी युद्धपातळीवर प्रयत्न होणे गरजेचे होते. ऐतिहासिक वास्तू नामशेष होण्याची भीती व्यक्त होत आहे. (समाप्त)

Web Title: Fear of the historic fortress extinction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.