शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भय इथले संपत नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 01:04 IST

दोन टेम्पोंची समोरासमोर धडक झाल्यानंतर झालेला मोठ्ठा आवाज, काळजाचा थरकाप उडविणाऱ्या किंचाळ्या आणि अपघाताचे छिन्नविछिन्न अवशेष आठवले तरी काळजात अजूनही धस्स होतं.

नाशिक : दोन टेम्पोंची समोरासमोर धडक झाल्यानंतर झालेला मोठ्ठा आवाज, काळजाचा थरकाप उडविणाऱ्या किंचाळ्या आणि अपघाताचे छिन्नविछिन्न अवशेष आठवले तरी काळजात अजूनही धस्स होतं. एका क्षणात घडलेली घटना आणि घटनेनंतर एकेक मृतदेह स्मशानभूमीत येतांनाचे दृश्यपाहून त्या भयावह अपघाताचे भय मानातून जात नाही. अशा भावनाविवश प्रतिक्रिया आजही अपघातग्रस्त कुटुंबीयांकडून उमटत होत्या.मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरवाडे फाट्याजवळ दोन आयशर टेम्पोच्या भीषण अपघातात आगरटाकळीतील राहुलनगरमधील एकाच घराण्यातील सात जणांना जीव गमवावा लागल्याच्या घटनेनंतर कुटुंबीय अजूनही सावरले नाही. मयतांना अग्निडाग दिल्यानंतर जणू काही गंभीर घडलेच नाही अशा चेहऱ्याने जखमींसमोर जावे लागले. रात्री आणि दुसºया दिवशी म्हणजे सोमवारी सकाळीदेखील जखमींच्या उपचारासाठी आणि पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णालयातून हलविण्याचे काम सुरू होते. पिंपळगाव ग्रामीण रुग्णालयातून काही जखमींना जिल्हा रुग्णालयात तर काहींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या जखमींना त्या भयावह घटनेतील वास्तव माहिती होऊ नये यासाठी सारेच प्रयत्न करीत आहेत.कांडेकर, डांगे, गवळी आणि लोंढे कुटुंबीयांच्या डोळ्यासमोरून रविवारचा घातवार अजूनही जात नाही. घटनेतील तो आक्राळ चेहरा त्यांना अजूनही भयग्रस्त करून टाकतो. घटनेनंतरच्या रात्रीनंतर कुणीही शांत झोपू शकलेले नाही.रविवारचा काळा दिवस या कुटुंबीयांनाच नव्हे तर संपूर्ण टाकळीवासीयांना अस्वस्थ करणारा ठरला. गेल्या दोन दिवसांपासून अपघाताची चर्चा थांबलेली नाही. अपघाताच्या घटनेनंतर सारेच दु:खात असले तरी एकमेकांना आधार देण्याचे काम प्रत्येकाला करावे लागत आहे. डोळ्यातील आश्रू आटले आहेत, हुंदक्यांच्या आवाजातील गहिवर दु:खाची गहरी जाणीव निर्माण करणारा आहे. घरातील प्रत्येक लहान-मोठ्यांच्या डोळ्यात या मृत्यू तांडवाचे भय अजूनही स्पष्टपणे जाणवते.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात