शहरं
Join us  
Trending Stories
1
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
2
डॉक्टर जावयाने स्किन स्पेशलिस्ट लेकीला संपवलं; वडिलांचा मोठा निर्णय, ३ कोटीचं घर केलं दान
3
३ महिन्यांमध्ये १००० कोटी रुपयांचा फायदा; चांदीच्या किमतीनं 'यांना' केलं मालामाल
4
Video - अग्निकल्लोळ! गरीब रथ एक्स्प्रेसला भीषण आग; डबा जळून खाक, प्रवाशांना वाचवण्यात यश
5
जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीने केला महिलेवर ॲसिड हल्ला, तीन महिन्यांपूर्वी दाखल केला होता गुन्हा
6
मनसेला सोबत घेण्याचा प्रस्ताव दिलेलाच नाही! राऊतांचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले, "अजून ते स्वातंत्र्य चळवळीच्या काळातच"
7
अतिवृष्टीने खरीप गेला; रब्बीचा हंगाम देणार हात; धरणे, विहिरी तुडुंब भरल्याने यंदा पेरा ६५ लाख हेक्टरवर जाणार 
8
धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणं फायदेशीर ठरेल का, तेजी कायम राहिल? तज्ज्ञांचं म्हणणं काय?
9
७.५ कोटी कॅश, २.५ किलो सोनं, मर्सिडीज... 'भ्रष्ट' IPS अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड
10
‘राजद’ने शरद यादव यांच्या मुलाला तिकीट दिले अन् परत काढूनही घेतले, काँग्रेसनेही दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकीट नाकारले 
11
काहीतरी मोठं घडणारे... सोन्याच्या किमतीतील तेजीमुळे ही कसली भीती? दिग्गज अर्थतज्ज्ञानं दिला इशारा
12
काय सत्य अन् काय स्वप्न! गूढ वाढवणारा 'असंभव' सिनेमाचा टीझर पाहिलात का?
13
'ट्रेनमध्ये टाईम बॉम्ब लावलाय...', ऐकताच प्रवाशांमध्ये उडाली खळबळ; पोलिसांनी तपास करताच समोर आलं भलतंच कांड!
14
"महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल; तोपर्यंत सर्वांनी सबुरीने घ्या!"
15
Pakistan-Afghanistan War : युद्धविराम होऊनही पाकिस्तानकडून पक्तिका प्रांतात हल्ला; ३ अफगाण क्रिकेटपटू ठार
16
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी ओकली गरळ; अफगाणिस्तान भारताच्या हातात म्हणत संबंध तोडण्याची घोषणा!
17
'दंगल' फेम अभिनेत्री जायरा वसीमचा झाला निकाह, ६ वर्षांपूर्वीच धर्मासाठी सोडली ग्लॅमरची दुनिया
18
समीर वानखेडेप्रकरणी न्यायालयाचे केंद्रावर ताशेरे
19
रोहिणी हट्टंगडी साकारणार पूर्णा आजींची भूमिका; ज्योती चांदेकरांबद्दल म्हणाल्या, "तिच्यासोबत मी..."
20
रबाळेत सुगंधी उत्पादनांचा कारखाना आगीत खाक, ७० कामगार बचावले

‘कोरोना’ची भीती अन् बनावट सॅनिटायझरचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 16:17 IST

औषध प्रशासनाकडून केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून केवळ परवानाधारक उच्च प्रतीच्या सॅनिटायझरची विक्री करण्याचे आदेश दिले गेले आहे. सॅनिटायझर विक्रीसाठी औषध दुुकानात ठेवताना त्याचे बिलींग करणे अत्यावश्यक

ठळक मुद्देनिकृष्ट सॅनिटायझरमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम भरारी पथके शहरात कार्यान्वित करण्यात आली

नाशिक : शहरात सुदैवाने अद्याप एकही कोरोना संक्रमित रूग्ण आढळून आल्याची नोंद सरकारी दप्तरी नसली तरी नाशिककर राज्यात वाढत्या प्रादुर्भावामुळे चिंतीत होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देत आहेत. यामुळे शहरात निर्जुंतकद्रव्याला (सॅनिटायझर) मागणी वाढली आहे. या पार्श्वभुमीवर बाजारात बनावट सॅनिटायझरदेखील विक्रीसाठी दाखल झाल्याने त्याची अधिक भीती निर्माण झाली आहे.औषध प्रशासनाकडून केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून केवळ परवानाधारक उच्च प्रतीच्या सॅनिटायझरची विक्री करण्याचे आदेश दिले गेले आहे. सॅनिटायझर विक्रीसाठी औषध दुुकानात ठेवताना त्याचे बिलींग करणे अत्यावश्यक असल्याचेही औषध प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. बाजारात बनावट सॅनिटायझरचा छुपा पुरवठा करणाऱ्या उत्पादकांच्या दलालांचाही सुळसुळाट झाला आहे. या दलालांकडून औषधविक्रेत्यांना कमी किंमतीत अधिक नफ्याचे आमीष तसेच कुठल्याहीप्रकारच्या बिलाची आवश्यकता नसल्याचे सांगून निकृष्ट दर्जाचे सॅनिटायझर गळ्यात मारण्याचा प्रयत्नही शहरात होत आहे. खासकरून शहरातील सुशिक्षित भाग वगळता गावठाण व शहराजवळच्या खेड्यांमध्ये असे प्रकार होताना दिसत आहे. यामुळे बहुतांश मेडिकलमध्ये उच्चप्रतीचे सॅनिटायझर विक्रीसाठी नसून कमी किंमतीत कधी नव्हे त्या ब्रॅन्डचे सॅनिटायझर विकले जात आहेत. त्यामुळे निकृष्ट सॅनिटायझरच्या वापरामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी सॅनिटायझरचा वापर करताना अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. मुदतबाह्य सॅनिटायझरचा वापर कटाक्षाने टाळावा, असे आवाहनही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी केले आहे.बनावट सॅनिटायझरची विक्री रोखण्यासाठी औषध प्रशासन, मनपा आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय आरोग्यसेवा या शासकिय अस्थापनांकडून संयुक्तरित्या भरारी पथके शहरात कार्यान्वित करण्यात आली आहे. या पथकांचे प्रमुख औषध सहआयुक्त, जिल्हा शल्य चिकित्सक, मनपा आयुक्त असून पथकांद्वारे संशयित ठिकाणी छापेमारी करून बनावट सॅनिटायझरची जप्ती सुरू केली आहे. शहरात अद्याप तीन ठिकाणांहून अशाप्रकारचे निकृष्ट बनावट सॅनिटायझरचा साठा जप्त करण्यास भरारी पथकांना यश आले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयraidधाडHealthआरोग्य