संतप्त व्यापाऱ्यांचे धरणे

By Admin | Updated: April 30, 2017 01:30 IST2017-04-30T01:29:36+5:302017-04-30T01:30:01+5:30

मनमाड : वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, यामुळे व्यवसाय करणे अडचणीचे झाल्याने व्यापारी वर्गाने वीज कार्यालया-समोर ठिय्या देत धरणे आंदोलन केले.

Fear of Angry Traders | संतप्त व्यापाऱ्यांचे धरणे

संतप्त व्यापाऱ्यांचे धरणे

 मनमाड : वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, अघोषित भारनियमन, झीरो लोडशेडिंग यामुळे व्यवसाय करणे अडचणीचे झाल्याने शहरातील संतप्त व्यापारी वर्गाने वीज वितरणच्या विभागीय कार्यालया-समोर ठिय्या देत धरणे आंदोलन केले.
गेल्या काही दिवसांपासून मनमाड शहरात वीज पुरवठ्याच्या वाढत्या गोंधळाने नागरीक हैराण झाले आहे. एकीकडे उन्हाळ्यामुळे उष्णतेच्या प्रमाणात कमालीची वाढ झालेली असताना त्यात भारनियमनाची भर पडली आहे.कुठलीही पुर्वसुचना न देता वेळी अवेळी विज पुरवठा खंडीत होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून सहा ते सात तास विज पुरवठा बंद रहात असल्याने व्यापारी वर्गाला व्यवसाय करणे अडचणीचे झाले आहे.आज सकाळपासूनच विज गायब झाल्याने व्यापारी वर्गामधे संतापाची लाट उसळली.
दुपारपर्यंत विज न आल्याने संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाउ पारीक यांच्या नेतृत्वाखालीविज वितरणच्या विभागीय कार्यालयावर धाव घेतली. विज वितरणच्या कारभारा विरोधात घोषणाबाजी करत कार्यालयासमोर व्यापाऱ्यांनी ठिया मारून धरणे आंदोल केले.संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी वारंवार खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबद अधिकाऱ्यांना जाब विचारला.
वीज वितरणचे विभागीय अभियंता शैलेशकुमार यांनी व्यापाऱ्यांशी चर्चा करून येत्या आठवडाभरात कार्यवाही करण्याचे अश्वासन दिले. विज खंडीत होण्याचा वाढता प्रकार हा मनमाड शहर हे ‘जी’ झोन मधे गेले असल्याने होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगीतले.
या वर वाढती थकबाकी व वीजचोरी याला जबाबदार कोण असा जाब संतप्त व्यापाऱ्यांनी विचारला.विज वितरणचे अधिकारी व कर्मचारी शहरात वास्तव्यास रहात नसल्याचा आरोप या वेळी करण्यात आला.अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार पणा मुळे नियमीतपणे विज बिल भरणाऱ्या व्यापारी वर्गाला वेठीस धरले जात असल्याचे व्यापारी वर्गाचे म्हणने आहे.
या वेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाउ पारीक, उपाध्यक्ष सुरेश लोढा,दादा बंब, सचिव राजकमल पांडे, रइस फारूकी, अनिल गुंदेचा, राजू चंद्रात्रे, कुलदीपसिंग चोटमुरादी,दिपक मुनोत मनोज जंगम, मनोज आचलीया, असीफ शेख, अशोक व्यवहारे, आबा दिंडोरकर, रवी लोढा आदी व्यापारी उपस्थित होते.(वार्ताहर)

Web Title: Fear of Angry Traders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.