पितृपक्षामुळे मेथीच्या भाजीची मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 10:51 PM2019-09-20T22:51:20+5:302019-09-21T00:41:35+5:30

जिल्ह्यातील काही ठिकाणच्या भागात परतीच्या पावसाने तसेच ढगाळ हवामानामुळे शेतमाल खराब झाल्याने बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या शेतमालाची आवक काही प्रमाणात घटली आहे. गेल्या काही दिवसांपासून पितृपक्ष पंधरवडा सुरू झाल्याने मेथी भाजीला मागणी वाढली आहे. त्यामुळे मेथीचे दर काही प्रमाणात तेजीत आले आहे, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

Fatherhood increased the demand for fenugreek seeds | पितृपक्षामुळे मेथीच्या भाजीची मागणी वाढली

पितृपक्षामुळे मेथीच्या भाजीची मागणी वाढली

Next
ठळक मुद्देबाजार समिती : शेतमालाची आवक घटली

पंचवटी : जिल्ह्यातील काही ठिकाणच्या भागात परतीच्या पावसाने तसेच ढगाळ हवामानामुळे शेतमाल खराब झाल्याने बाजार समितीत
विक्रीसाठी येणाऱ्या शेतमालाची आवक काही प्रमाणात घटली आहे. गेल्या काही दिवसांपासून पितृपक्ष पंधरवडा सुरू झाल्याने मेथी भाजीला मागणी वाढली आहे. त्यामुळे मेथीचे दर काही प्रमाणात तेजीत आले आहे, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.
गुरु वारी (दि.१९) नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबीर प्रति जुडीला पंचवीस रुपये, असा बाजार भाव मिळाल्याचे भाजीपाला व्यापाऱ्यांनी सांगितले.
परतीच्या पावसामुळे सर्व पालेभाज्यांवर वातावरणाचा परिणाम जाणवल्याने बाजारभाव तेजीत आले आहे. गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाचे आगमन झाल्याने शेतातील उभे पीक खराब झाले. त्यातच ढगाळ वातावरणाचादेखील परिणाम पिकांवर जाणवल्याने शेतमालाची आवक घटली आहे. पितृपक्ष पंधरवडा असल्याने मेथी भाजीला ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी आहे त्यामुळे मेथीचे दर टिकून आहे. शनिवारी सायंकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्र ीसाठी आलेल्या मेथी, कोथिंबीर, कांदापात तसेच शेपूला बºयापैकी बाजारभाव मिळाल्याने बळीराजाने समाधान व्यक्त केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून मेथी भाजीची आवक वाढलेली आहे त्यामुळे मेथी जुडीला साधारणपणे आठशे ते हजार रु पये शेकडा असा बाजारभाव मिळत होता, मात्र गेल्या आठवड्यापासून पितृपक्ष पंधरवडा सुरू झाल्याने मेथी भाजीला मागणी वाढली आहे. त्यामुळे मेथीचे दर काही प्रमाणात तेजीत आले आहेत.

Web Title: Fatherhood increased the demand for fenugreek seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.