शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

लोकप्रतिनिधीच्या वडिलांनी नांगरला वहिवाट रस्ता

By admin | Updated: August 5, 2016 23:56 IST

शेतकऱ्यांची गैरसोय : ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान न केल्याचा वचपा काढला

 पाटोदा : ग्रामपंचायत निवडणुकीत आम्हाला मतदान न केल्याने पराभव झाल्याचे शल्य मनात ठेवून पाटोदा गटाच्या जिल्हा परिषद सदस्य सोनाली पवार यांच्या वडिलांनी खडीकरण झालेला दहेगाव - पाटोदा शिवारातील जाधव वस्ती ते धनवटे वस्तीदरम्यानचा रस्ताच नांगरून टाकल्याने परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे. या वहिवाट रस्त्याने शाळेत जाणाऱ्या चिमुरड्यांची रस्त्याअभावी शाळा बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. याबाबत दहेगाव येथील ग्रामस्थांनी पाटोदा शिवारातील जाधव वस्ती ते धनवटे वस्तीचा रस्ता मोकळा करून द्यावा ही विनंती तालुक्याच्या अधिकारीवर्गाला निवेदन देऊन केली आहे; मात्र संबंधित अधिकारी पवार यांच्या राजकीय दबावापोटी लक्ष देत नसल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.सदर तीन किलोमीटर रस्त्याचे खडीकरणाचे काम माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब पिंपरकर यांनी २००८ साली जिल्हा परिषदेच्या विशेष दुरु स्ती योजनेतून केले. मात्र आपल्या राजकीय वर्चस्वाचा वापर करून मुलगी जि.प. सदस्य असल्यामुळे पदाचा गैरफायदा घेऊन अशोक वामन पवार यांनी त्यांच्या मालकीचा गट नंबर ४५ जवळील वहिवाट रस्ता नांगरून नष्ट करून टाकला आहे व गट नंबर ४५ मध्ये रस्त्याचे क्षेत्र अतिक्रमण करून समाविष्ट केले आहे. गट नंबर ४५ च्या मागे पुढे सदरचा रस्ता कायम असून, पवार यांनी शेजारील रस्ता शेतकऱ्यांना त्रास देण्यासाठी नष्ट केला असल्याची तक्रार निवेदनात केली आहे.सध्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून, पेरणी करणे, पिकांची कोळपणी करणे, निंदणी करणे, पिकांना खते टाकणे गरजेचे आहे, मात्र रस्ता नसल्याने या भागातील शेतकऱ्यांना शेतात ये- जा करता येत नसल्याने शेती पडीत ठेवण्याची वेळ आली आहे. तसेच मुलांना शाळेत जाण्यासाठी हाच रस्ता होता मात्र तो नांगरल्याने मुलांना शाळेत जाता येत नाही त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.गट नंबर ४५ च्या समोरील नष्ट झालेला रस्ता पूर्ववत सुरू करण्यात यावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी प्रांताधिकारी वासंती माळी, तहसीलदार शरद मंडलिक, मंडळ अधिकारी आर के खैरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री, पालकमंत्री गिरीश महाजन, बांधकाम विभाग पंचायत समिती येवला यांना निवेदने दिली आहेत. निवेदनावर रामचंद्र घोरपडे, भागवत बोराडे, प्रकाश पगार, सखाराम गुंडगळ , मधुकर गाजरे, चांगदेव दौंडे, गणेश दौंडे, विठ्ठल दौंडे, बबन माणिक जाधव, अर्जुन जाधव, माधव राजगुरू, बाबूराव काळे, रामदास जाधव, शिवाजी बटवल, बबन ओंकार बटवल, अमिन शेख, साहेबराव पवार, अशोक घोरपडे, समाधान पवार, ज्ञानेश्वर पगार आदिंच्या सह्या आहेत. दरम्यान या शेतकऱ्यांनी मे महिन्यात प्रांताना तर जुलै महिन्यात पालकमंत्र्यांना निवेदन दिले आहे.(वार्ताहर)