खडकतळे येथे पिता-पुत्राचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 16:40 IST2021-04-17T16:39:52+5:302021-04-17T16:40:17+5:30
पिंपळगाव वाखारी : खडकतळे येथे एकाच कुटुंबातील पिता व पुत्राचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

खडकतळे येथे पिता-पुत्राचा मृत्यू
ठळक मुद्देदोन दिवसांच्या अंतराने उपचारादरम्यान मृत्यू
पिंपळगाव वाखारी : खडकतळे येथे एकाच कुटुंबातील पिता व पुत्राचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
खडकतळे येथील बाप्पू रामभाऊ भामरे (६२) यांचा गुढीपाडव्याच्या दिवशी मृत्यू झाला. त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा योगेश बाप्पू भामरे यालाही कोविडची लक्षणे दिसून आली. दोन दिवसांच्या अंतराने योगेश (३२) याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. योगेश हा कुटुंबातला एकुलता मुलगा असल्याने, त्याच्या जाण्याने कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. पिता-पुत्रांच्या मृत्युमुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.