अतिक्रमण हटविण्यासाठी येवला पालिकेसमोर उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 00:49 IST2021-02-09T22:06:07+5:302021-02-10T00:49:20+5:30
येवला : स्वमालकीच्या प्लॉटवर झालेले अतिक्रमण हटवा, या मागणीसाठी येथील अश्पाक अन्सारी यांनी येवला नगरपालिका कार्यालयासमोर सुरू केलेले बेमुदत उपोषण मंगळवारी (दि.९) १६ व्या दिवशीही सुरूच आहे.

अतिक्रमण हटविण्यासाठी येवला पालिकेसमोर उपोषण
येवला : स्वमालकीच्या प्लॉटवर झालेले अतिक्रमण हटवा, या मागणीसाठी येथील अश्पाक अन्सारी यांनी येवला नगरपालिका कार्यालयासमोर सुरू केलेले बेमुदत उपोषण मंगळवारी (दि.९) १६ व्या दिवशीही सुरूच आहे.
२५ जानेवारी पासून उपोषण सुरु केलेल्या अश्पाक मो. जाबीर अन्सारी यांनी येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन दिले आहे. आपल्या मालकीच्या शहरातील मिल्लतनगर येथील (रा.स.नं. १७१/१/) प्लॉट नं. ११ वर नगरसेविका साबिया मो. सलीम मोमीन यांनी अतिक्रमण केले आहे, हे अतिक्रमण हटवून त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणीही निवेदनात त्यांनी केली आहे. दरम्यान या प्रकरणी अन्सारी यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांचेकडेही विनंती अर्ज केला आहे.