शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

दुष्काळात आधार देणारे शेततळे झाले पोरके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 3:28 PM

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील काही गावामध्ये पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शेतकरी वर्गाने आपल्या शेतामध्ये शेततळे तयार करून पिके वाचविण्यासाठी यशस्वी प्रयोग केला होता. परंतु दोन ते तीन वर्षांपासून तालुक्यात पावसाचे प्रमाण वाढल्याने दुष्काळात आधार देणारे शेततळे आता पोरके झाले आहे.

ठळक मुद्देपावसाचे प्रमाण वाढल्याने बळीराजांचा शेततळ्याकडे कानाडोळा

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील काही गावामध्ये पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शेतकरी वर्गाने आपल्या शेतामध्ये शेततळे तयार करून पिके वाचविण्यासाठी यशस्वी प्रयोग केला होता. परंतु दोन ते तीन वर्षांपासून तालुक्यात पावसाचे प्रमाण वाढल्याने दुष्काळात आधार देणारे शेततळे आता पोरके झाले आहे.मागेल त्याला शेततळे ही योजना शासनाने शेतकरी वर्गाला दिली होती. त्याचा लाभ तालुक्यातील ब-याच शेतकरी वर्गाने घेतला. कारण तीन वर्षे अगोदर तालुक्यातील पाण्याची स्थिती ही दुष्काळजन्य होती.शेतातील पिकांना पाणी कमी पडु नये म्हणुन शेतकरी वर्गाने आपल्या शेतामध्ये शेततळे तयार करण्यावर भर दिली होती. सन २०१५ ते २०१७ पर्यंत दिंडोरी तालुक्यातील शेतकरी वर्ग आपल्या शेतामध्ये पिकविलेला शेती माल वाचविण्यासाठी पाणी कोठून मिळवावे या विवेचनेत पडला होता. त्यासाठी शेतकरी वर्गाने बोअरींग, धरणाच्या ठिकाणाहून पाईपलाईन, विहीर खोदणे इ.माध्यमाचा वापर केला. परंतु पावसाचे प्रमाण अत्यंत कमी प्रमाणात असल्यामुळे विहीरीनां,बोअर वेल,पाणी लागत नव्हते.मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करून ही पाणी मिळत नव्हते.जगाचा पोशिंदा शेतकरी वर्ग पाण्यासाठी जीवाचे रान करतो.पण त्याला यश मिळत नाही. याचा शासन दरबारी अहवाल गेला. याचा अभ्यास करून राज्य सरकारने ९ फेब्रुवारी २०१६ ला शेतकरी वर्गासाठी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी" मागेल त्याला शेततळे " ही योजना उपलब्ध करून दिली. या योजनेसाठी शासनाने शेतकरी वर्गाला शेततळ्यासाठी अनुदान ही सुरू केले.या फायदा तालुक्यातील जवळ जवळ ४०ते ५० टक्के शेतकरी वर्गाने लाभ घेतला. व बघता बघता तालुक्यात २६० शेततळे शेतकरी वर्गाने आपल्या पिकांच्या सरासरी नुसार आखणी केली. व पिकांना शेततळ्याच्या माध्यमातून हक्काचे पाणी उपलब्ध केले. व शेततळे पिकांसाठी एक प्रकारे जलसंजीवनी मिळाल्याने बळीराजांच्या चेहर्यावर हसु निर्माण झाले . सन २०१५ ते २०१७ हा कालखंड शेतकरी वर्गाला पाणी उपलब्ध करण्यासाठी अतिशय खडतर गेला. परंतु मागेल त्याला शेततळे ही योजना उपलब्ध झाल्यामुळे शेतकरी वर्गाने पाणी टंचाईवर मात केली. व शेततळ्यातील उपलब्ध पाणी साठ्यामध्ये द्राक्षे, भाजीपाला, व नगदी भांडवल मिळून देणारे पिके शेतकरी वर्ग जोमाने घेऊ लागला.परंतु सध्या दोन वर्षापासून दिंडोरी तालुक्यात पावसाचे प्रमाण वाढल्याने व विहीरी, बोअरवेल यांना पाणी मोठ्या प्रमाणावर येत असल्यामुळे दुष्काळात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आधार देणारे शेततळ्याकडे बळीराजांने कानाडोळा केल्याने शेततळे आधाराविना पोरके झाले आहे.ग्रामीण भागातील शेतकरी वर्गासाठी शेततळे हे एक प्रकारे जलसंजीवनी देणारे ठरले आहे. परंतु सध्या पावसाचे प्रमाण मुबलक झाल्याने शेतकरी वर्गाचा शेततळ्याकडे कानाडोळा निर्माण झाला असला तरी भाविष्यात त्याचा कधी ना कधी उपयोग होणार आहे. त्यासाठी आम्ही शेततळ्याची विशेष काळजी घेत आहे. कारण दुष्काळ जन्य स्थिती त आमच्या पिकांना शेततळ्यानीच आधार दिला आहे- रामनाथ संतू पिंगळे, शेतकरी, अंबे जानोरी.शेततळे ही योजना शासनाने शेतकरी वर्गाला ठरवून दिलेली एक प्रकारे जलसंजीवनी योजना आहे. जरी यंदा पावसाचे प्रमाण मुबलक असले तरी शेतकरी वर्गाने पुढील हंगामासाठीचा वातावरणातील बदलावा कसा असेल हे सांगणे कठीण आहे. परंतु शेतकरी वर्गाने शेततळ्याची निगा राखावी.व पाणी साठा यांची काळजी घेऊन नियोजन करावे.- अभिजीत जमधडे, दिंडोरी तालुका कृषी अधिकारी. 

टॅग्स :Waterपाणीkalwaकळवा