शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

शेतकाऱ्यांना रब्बी हंगामाच्या भांडवलाची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 6:53 PM

जळगाव नेऊर : येवला तालुक्यात गेली दहा-पंधरा दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसाने बाजरी, मका, कांदा रोपे, कांदा पिकाची दाणादाण झाल्याने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला मका, सोयाबीन, बाजरीचा घास मुसळधार पावसात वाहून जातो की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देसोंगणीचे दर वाढले : पाऊस उघडताच मजुरांची समस्या भेडसावणार

जळगाव नेऊर : येवला तालुक्यात गेली दहा-पंधरा दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसाने बाजरी, मका, कांदा रोपे, कांदा पिकाची दाणादाण झाल्याने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला मका, सोयाबीन, बाजरीचा घास मुसळधार पावसात वाहून जातो की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. पाऊसही मोठा लपंडाव खेळत असून, एका गावावर पाऊस, दुसºया गावावर वादळ यामुळे काही गावातील मका उद्ध्वस्त झाला तर काही गावातील मका उभा आहे. चार चार वेळा कांदा बियाणे टाकूनही जमिनीवर येण्याच्या अगोदरच मुसळधार पावसाच्या तडाख्याने झोडपल्याने कांदा बियाणे संपुष्टात येऊन हजारो रु पये खर्च वाया गेल्याने शेतकºयांवर आर्थिक संकट ओढावले असून, शेतकºयांना कांदा पिकाला मुकावे लागणार आहे. अगोदरच लावलेला पोळ कांदा नष्ट झालेला असताना कांदा पीक संकटात सापडले आहे तर अनेक शेतकºयांचे मुसळधार पावसाने बाजरीचे पीक पाण्यात असून, एकूणच खरिपातील पिकांची दाणादाण झाल्याने शेतकºयांना मात्र खरिपातील पिके डोळ्यादेखत नष्ट होत चाललेली असताना त्याच खरीप पिकांच्या भरवशावर रब्बी पिके उभी करण्यासाठी भांडवल उभे कसे करावे याची चिंता पडली आहे. गेली दहा-बारा दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने सोंगणीसाठी आलेले मका, सोयाबीन, बाजरी, भुईमूग या पिकांना मात्र त्याचा फटका बसत असून, पिके संकटात सापडली आहेत. यावर्षी सोंगणीचे दर वाढले असून, मागील वर्षी मका व सोयाबीन चार हजार रु पये प्रतिएकरप्रमाणे सोंगणी केली जात होती. यावर्षी मात्र मुसळधार पावसाने मजूर कामावर येत नसल्याने सोंगणीचे दर हजार ते पंधराशे रु पयाने वाढले आहेत.माझा अडीच एकर मका असून, दररोज चालणाºया मुसळधार पावसाने मका भुईसपाट झाला आहे. शासनाने बाजरी, मका, कांदा या नुकसानग्रस्त शेतकºयांचे पंचनामे करून आर्थिक मदत करावी, जेणेकरून त्यांना रब्बी पिके तरी उभे करता येतील.- विलास कदम, नेऊरगावमका, बाजरी, सोयाबीनचे दर(प्रतिक्विंटलचे भाव सरासरी)मका - १२२१सोयाबीन - ३७५१बाजरी - ११४८फोटो : नेऊरगाव येथील विलास कदम यांची भुईसपाट झालेले मका पीक.(24जळगाव नेऊर1)

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती