कांदा दर घसरणीने शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 09:49 PM2020-08-07T21:49:57+5:302020-08-08T01:00:55+5:30

गेल्या काही महिन्यांपासून कांदा दरात घसरण सुरू असून, कांदा उत्पादक अडचणीत सापडला आहे. सरकार याप्रश्नी मार्ग काढत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

Farmers worried over falling onion prices | कांदा दर घसरणीने शेतकरी हवालदिल

कांदा दर घसरणीने शेतकरी हवालदिल

Next
ठळक मुद्देदुर्लक्ष : प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणीकांदा दर घसरणीने शेतकरी हवालदिल

निफाड : गेल्या काही महिन्यांपासून कांदा दरात घसरण सुरू असून, कांदा उत्पादक अडचणीत सापडला आहे. सरकार याप्रश्नी मार्ग काढत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
कांदा दरप्रश्नावर सरकारने योग्य निर्णय न घेतल्यास मोठ्या स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज वडघुले पाटील यांनी दिला आहे. वडघुले म्हणाले की, कोरोना संकटामुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष, भाजीपाला, मका, सोयाबीन आदी पिकांना बाजार उपलब्ध झाला नाही. त्यामुळे मातीमोल दरात शेतमालाची विक्री करावी लागली. त्यात कांदा दरात घसरण सुरू असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आॅक्टोबर महिन्यापर्यंत नवीन कांदा बाजारात येईल; परंतु सध्या कांदा दरात प्रचंड घसरण झाली आहे. यातून मार्ग निघाला नाही तर शेतकरी मोठ्या संकटात सापडेल. केंद्र सरकारने तातडीने निर्यात प्रोत्साहन योजना लागू करून निर्यातीला चालना देण्याची आवश्यकता आहे. पर्यायाने पुन्हा कांदा दरात घसरण होईल यासाठी आताच नियोजन होण्याची आवशकता आहे. मागच्या काळात रेल्वे वॅगन्स उपलब्ध करून दिल्या होत्या.
त्याच प्रकारे वॅगन्स उपलब्ध करून दिल्या तर निर्यात थांबणार नाही यासाठी शासनाने उपाययोजना करण्याची गरज आहे. युरोपात संधी असल्याने विशेष प्रयत्न करून युरोप देशांमध्ये निर्यातीसाठी ठोस पाऊले उचलण्याची गरज आहे. नाफेडकडून दुप्पट कांदा साठवण करण्यात आली असल्याने बाजारपेठेवर विसंबून न राहता निर्यातीसाठी चालना देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मध्य प्रदेशच्या धर्तीवर भावांतर योजना लागू करून उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा ही वजावटीची रक्कम सरकारने निधीची तरतूद करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी वडघुले यांनी केली आहे.

Web Title: Farmers worried over falling onion prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.