शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पाणी असूनही न सोडल्यास शेतकरी रस्त्यावर उतरतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 01:49 IST

रब्बी पिकांसाठी पालखेड डावा कालव्यातून सोमवार, दि.१९ नोव्हेंबरचा पाणी सोडण्याचा मुहूर्त टळला तर शेतकरी कायदा हातात घेतील, अशा इशारा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी जिल्हा प्रशासनाला दिला. पालखेड लाभक्षेत्रातील दिंडोरी, निफाड व येवला तालुक्यातील रब्बी पिकांसाठी पालखेड डावा कालव्यातून आवर्तन सोडण्यात यावे यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्देभुजबळ : जिल्हा प्रशासनाला इशारा; जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट

नाशिक : रब्बी पिकांसाठी पालखेड डावा कालव्यातून सोमवार, दि.१९ नोव्हेंबरचा पाणी सोडण्याचा मुहूर्त टळला तर शेतकरी कायदा हातात घेतील, अशा इशारा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी जिल्हा प्रशासनाला दिला. पालखेड लाभक्षेत्रातील दिंडोरी, निफाड व येवला तालुक्यातील रब्बी पिकांसाठी पालखेड डावा कालव्यातून आवर्तन सोडण्यात यावे यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नाशिक जिल्ह्णात दुष्काळाची भीषण परिस्थितीत असून, जिल्ह्णातील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. पालखेड डावा कालव्याच्या भरवशावर लाभक्षेत्रातील दिंडोरी, निफाड व येवला तालुक्यातील शेतकºयांनी रब्बी हंगामाची पेरणी केली आहे. त्यामुळे दि.१५ नोव्हेंबरपासून रब्बी हंगामासाठी आवर्तन देण्याची मी यापूर्वी मागणी केलेली होती आणि १५ नोव्हेंबरपर्यंत पाणी देऊ, असे मला आश्वासन देण्यात आलेले होते.कालवा सल्लागार समितीची बैठक झालेली नसल्यामुळे आवर्तनांबाबत संभ्रम निर्माण होऊन शेतकºयांमध्ये तीव्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मला यावे लागल्याचे भुजबळांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सोमवार, दि.१९ नोव्हेंबर रोजी पाणी सोडणार असल्याचे सांगितले. पाणीवापर संस्थांना त्यांचा पूर्ण कोटा द्या आणि आवर्तनादरम्यान शेतकºयांना त्रास देऊ नका, असेही भुजबळांनी सांगितले. यावेळी छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्णातील येवला व लासलगाव, ओझर आणि पिंपळगाव या महसूल मंडळामध्ये दुष्काळाची परिस्थिती असताना या मंडळाचा समावेश न झाल्याने या महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित करून सवलती लागू करण्यासाठी शासनाला अहवाल पाठवावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, आमदार नरहरी झिरवाळ, माजी आमदार दिलीप बनकर, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, कार्याध्यक्ष डॉ. भारती पवार, राष्ट्रवादी जलचिंतन सेलचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र जाधव, जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर, शेतकरी संघटनेचे नेते संतू पाटील झांबरे, अरुण थोरात, गणपत कांदळकर, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, अधीक्षक अभियंता राजेश मोरे व जलसंपदा विभागाचे उपस्थित होते.आवर्तनाबाबत नियोजन नसल्याने पाण्याअभावी शेतकºयांची पिके जळायला लागली आहेत. लाभक्षेत्रातील शेतकºयांनी ठिबक सिंचनाचा वापर करून द्राक्षे, डाळींब यांसह इतर रब्बीची पिके घेतलेली आहेत. त्याचबरोबर प्रामुख्याने येवला व निफाड तालुक्यातील शेतकºयांनी कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली आहे. कांदा हे नगदी पीक असल्याने पाण्याअभावी शेतकºयांची हानी होणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणीChhagan Bhujbalछगन भुजबळ