पेट्रोलअभावी शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 08:46 PM2021-05-17T20:46:26+5:302021-05-18T00:06:14+5:30

ब्राह्मणगाव : पेट्रोल, डिझेल वितरणावर निर्बंध आल्याने मोटारसायकलधारक शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली असून, पेट्रोल पंपावर सद्या नियम कडक असल्याने अनेकांना अडचणी येत आहेत.

Farmers in trouble due to lack of petrol | पेट्रोलअभावी शेतकरी अडचणीत

पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळण्यासाठी प्रतीक्षेत असलेले वाहनधारक.

Next
ठळक मुद्दे दुचाकी लोटून पेट्रोल पंपापर्यंत परत जावे लागत आहे.

ब्राह्मणगाव : पेट्रोल, डिझेल वितरणावर निर्बंध आल्याने मोटारसायकलधारक शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली असून, पेट्रोल पंपावर सद्या नियम कडक असल्याने अनेकांना अडचणी येत आहेत.

अत्यावश्यक सेवा, सरकारी कर्मचारी, तसेच शेती कामात ट्रॅक्टरसाठी डिझेल, पेट्रोल पंपावर नियमित पेट्रोल, डिझेल बरोबर दिले जाते आहे. लॉकडाऊनसाठी कडक नियमावलीत निर्णय उत्तम असला तरी ग्रामीण भागात शेती कामासाठी शेतकऱ्यांना गावातून शेतात व शेतातून गावात यावे लागते. तसेच शेतात राहणाऱ्या लोकांना कामानिमित्त गावात जावे लागते. त्यामुळे मोटारसायकल हे सद्याचे सर्वांचे सोपे साधन आहे. मात्र, लॉकडाऊनच्या कडक नियमावलीमुळे पेट्रोलपंपावरही पोलीस प्रशासनाचे लक्ष असल्याने मोटारसायकलधारकांना रिकाम्या हाती दुचाकी लोटून पेट्रोल पंपापर्यंत परत जावे लागत आहे. त्यामुळे सर्वांची असून, अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे.
 

Web Title: Farmers in trouble due to lack of petrol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app