पाटोद्यात शेतकऱ्याची आत्महत्या
By Admin | Updated: June 12, 2017 00:04 IST2017-06-12T00:04:39+5:302017-06-12T00:04:55+5:30
पाटोद्यात शेतकऱ्याची आत्महत्या

पाटोद्यात शेतकऱ्याची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटोदा : येवला तालुक्यातील पाटोदा येथील अमीर लतीफ चौधरी (५५) या शेतकऱ्याने नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली होती.
त्यानी आपल्या शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. शेतकरी आत्महत्येची या परिसरातील आठवड्यातील ही दुसरी घटना असून, गावावर शोककळा पसरली आहे. चौधरी यांच्या नावावर दोन एकरच्या आसपास शेती असून शेतीसाठी त्यांनी पाटोदा सोसायटी कडून कर्ज घेतलेले आहे. गेल्या तीन चार वर्षापासून नापिकीमुळे कर्जाचा डोंगर वाढत चालला होता. त्यामुळे वैफल्यग्रस्त होत त्यांनी आत्महत्या केली.घटना स्थळी पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र खैरनार, उगलमुगले, विजय जाधव संजीवकुमार मोरे यांनी पंचनामा केला.