शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यात आमदारांच्या घरासमोर शेतकऱ्यांचा सत्याग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 18:10 IST

नाशिक :शेतकऱ्यांना कायद्याने संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी व शेतमालास उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा अशी देशभरातील शेतकऱ्यांची मागणी आहे. यासंदर्भात केंद्रीय पातळीवर चर्चा घडवून आणण्यासाठी विशेष संसदीय आधिवेशन बोलाविण्यात यावे यासाठी राज्यातील आमदारांनी राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा या मागणीसाठी नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीने शुक्रवारी (दि. २५) सहकार राज्यमंत्री ...

ठळक मुद्देनाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीचे आंदोलन जिल्ह्यातील आमदारांच्या घरासमोर केला सत्याग्रह शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विशेष संसदीय अधिवेशनासाठी पाठपुरावा करण्याची मागणी

नाशिक :शेतकऱ्यांना कायद्याने संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी व शेतमालास उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा अशी देशभरातील शेतकऱ्यांची मागणी आहे. यासंदर्भात केंद्रीय पातळीवर चर्चा घडवून आणण्यासाठी विशेष संसदीय आधिवेशन बोलाविण्यात यावे यासाठी राज्यातील आमदारांनी राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा या मागणीसाठी नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीने शुक्रवारी (दि. २५) सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील आमदारांच्या घरासमोर सत्याग्रह करून त्यांना निवेदने दिली. नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीने सत्ताधारी भाजपाचे शहरातील आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे व बाळासाहेब सानप यांच्यासह शिवसेनेचे योगेश घोलप यांच्या घरासमोर ढोल वाजवून सत्याग्रह आंदोलन केले. आमदारांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर विधिमंडळात चर्चा करून समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करावी. तसेच शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मांडण्यात येणारी विधेयके सादर करण्यासाठी तसेच त्यावर सविस्तर चर्चा घडवून आणण्यासाठी केंद्र स्तरावर संसदेचे विशेष अधिवेशन बोलाविण्यासाठी पाठपुरावा करावा, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या. भाजपाच्या तिन्ही आमदारांनी आंदोलकांना सामोरे जाऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले. शिवसेनेचे आमदार योगेश घोलप शहरात नसल्याने त्यांच्या स्वीय सहायकांनी निवेदन स्वीकारले.तर इगतपुरीत आमदार निर्मला गावीत उपस्थित नसल्याने त्यांच्या कन्या तथा जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष नयना गावीत यांनी शेतऱ्यांचे निवेदन स्विकारले.शेतकरी आंदोलन समितीने नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या घरासमोर आंदोलन करून मागण्यांचे निवेदन दिल्यामुळे गेल्या वर्षी १ जून रोजी झालेल्या राज्यव्यापी शेतकरी संपाची तीव्रता पुन्हा एकदा जाणवू लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

रविवारी पालकमंत्र्यांना निवेदन देणार

शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात बुधवारी जिल्ह्यातील आमदारांना निवेदन दिल्यानंतर रविवारी (दि.२७) जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना अशाच प्रकारे निवेदन देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे व दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याही घरासमोर सत्याग्रह करून निवेदन देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील काही भागाचे प्रतिनिधित्व करणारे तथा केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रतिनिधी केंद्रीय संरक्षणमंत्री सुभाष भामरे यांनाही मागण्यांचे निवेदन देण्याचे आंदोलन समितीचे नियोजन असून, येत्या १ जूनला नाशिक शहरात गतवर्षाच्या किसान क्रांती मोर्चाच्या शेतकरी संपाची दाहकता जागवणारा मोर्चाही काढण्यात येणार आहे.

टॅग्स :agitationआंदोलनNashikनाशिकFarmerशेतकरीMLAआमदार