पावसाच्या सरींमुळे शेतकऱ्यांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 01:04 AM2021-04-12T01:04:22+5:302021-04-12T01:04:45+5:30

ब्राह्मणगाव : येथे सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाच्या सरी आल्याने कांदा उत्पादकांची चांगलीच धावपळ उडाली. 

Farmers rush due to rains | पावसाच्या सरींमुळे शेतकऱ्यांची धावपळ

ब्राह्मणगाव येथे पावसाच्या सरी आल्याने कांदा उत्पादकांची उडालेली धावपळ.

Next
ठळक मुद्देब्राम्हणगाव परिसरात कांदा काढणीची कामे जोरात

ब्राह्मणगाव : येथे सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाच्या सरी आल्याने कांदा उत्पादकांची चांगलीच धावपळ उडाली. 
सध्या कांदा काढणी सर्वत्र जोरात सुरू असून, त्यातच उन्हाची तीव्रता खूपच वाढत असल्याने रविवारी पाच वाजता खूपच आभाळ भरून आले. त्यातच अचानक पावसाच्या सरी येऊ लागल्याने काढलेला कांदा शेतातच झाकण्यासाठी एकच धावपळ उडाली. प्लास्टिक कागद घेऊन सर्वत्र एकच धावपळ उडाली. सध्या उन्हाळी कांदा काढणीला वेग आला आहे. 
शेतमजुरांची उपलब्धता कमी असल्याने शेतकरी धावपळ करून कांदा लवकर काढून चाळीत साठवणीच्या कामात गुंतला आहे. त्यातच हवामान खात्याने पुढील चार दिवस वादळ वाऱ्यासह पावसाची शक्यता सांगितली असून, त्याप्रमाणे रविवार सकाळपासूनच आभाळ भरून आले आहे. दिवसभर तापमानात वाढ झाल्याने उष्मा खूपच वाढत असल्याने पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचे नगदी पीक असलेल्या कांद्याची काळजी घ्यावी लागत आहे. सद्या कांद्याचे दर खूपच कमी असून, त्यामुळे सर्वच शेतकरी कांदा साठवणूक करीत आहेत.

Web Title: Farmers rush due to rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.