शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आंदोलकांची वाहने पोलिसांनी नाशिकच्या वेशीवर रोखली, सरकारकडून दडपशाही सुरू असल्याचा आंदोलकांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2019 19:39 IST

फडणवीस सरकार मायबाप शेतकऱ्याला वेठीस धरत असून, त्यांच्या संयमाचा अंत बघितला जात आहे. या सरकारने केवळ विश्वासघात केला आहे असा गंभीर आरोप अजित नवले यांनी केला.

नाशिक  -  सरकार दडपशाही करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळेच नाशिकचे वेशीवर आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्यात आलेले आहे.   अहमनगर वरून येणाऱ्या शेतकऱ्यांना सिन्नर परिसरात रोखण्यात आले आहे.  तसेच पेठ सुरगाणा दिंडोरी कळवण शेतकऱ्यांना म्हसरूळ येथे रोखण्यात आले आहे, असा आरोप किसान सभेचे अजित नवले यांनी केलेला आहे.  फडणवीस सरकार मायबाप शेतकऱ्याला वेठीस धरत असून, त्यांच्या संयमाचा अंत बघितला जात आहे.  या सरकारने केवळ विश्वासघात केलेला आहे असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

 जेव्हा शेतकरी नाशिकच्या महामार्ग बस स्थानकात जमले आणि ताकद दिसली तेव्हा पालक मंत्री गिरीश महाजन यांनी चर्चेसाठी या असे सांगितले.  पूर्वी आम्ही त्यांच्याशी संपर्क करत होतो. तेव्हा ते वेळ देत नव्हते, अशी टीकाही नवले यांनी केली आहे. एक-दीड तास मागेपुढे जरी झाले तरी लाल वादळ थांबणार नाही. विधानसभेला लाल वादळ घेराव घातल्याशिवाय राहणार नाही. गोदाकाठच्या पवित्र भूमीतून हे वादळ अरबी समुद्राला जाऊन मिळणार आहे, असे आंदोलन नेतृत्व करणारे आमदार जे. पी. गावित, अजित नवले यांनी स्पष्ट केले. 

बुधवारी विधानसभेला घेरावकिसान सभेचा लॉँग मार्च येत्या बुधवारी (दि.२७) मुंबईत धडकणार आहे. या मोर्चात राज्यभरातून मोठ्या संख्येने शेतकरी, आदिवासी क ष्टकरी वर्ग सहभागी होणार आहे. शेतक-यांसह आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी हा लॉँग मार्च काढला जात आहे. बुधवारी मोर्चेकरी विधानसभेला घेराव घालणार आहे. चोख बंदोबस्त असा...लॉँगमार्चसाठी पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. दोन सहायक आयुक्तांसह पाच वरिष्ठ पोलीस निरीक्षक, २५ उपनिरीक्षक, १०० महिला-पुरु ष पोलीस कर्मचारी आणि राज्य राखीव दलाच्या तुकडीसह शीघ्रकृती दलाची तुकडीही तैनात करण्यात येणार आहे. तसेच शहर पोलीसांच्या दिमतीला नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिका-यांसह दीड हजार पोलीसांचा चोख पोलीस बंदोबस्त आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीNashikनाशिक