शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
अरुणाचल हादरलं! HIV रॅकेट आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
3
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
4
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
5
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
6
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
7
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
9
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
10
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
11
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
12
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
13
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
14
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
15
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
16
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
17
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
18
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
19
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
20
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...

खासगी कंपन्यांच्या बियाण्यांना शेतकऱ्यांची पसंती ; महाबीज, एनएससी पुरवठा, विक्रीत पिछाडीवर

By नामदेव भोर | Updated: June 26, 2020 17:51 IST

महाबीजच्या बियाण्यांच्या उगवण क्षमतेच्या बाबतीत वारंवार तक्रारी असल्याने दिवसेंदिवस शेतकऱ्यांचा कल खासगी कंपन्यांचे बियाणे खरेदीकडे वाढत आहे. त्यामुळे खरिपाच्या पार्श्वभूमीवर एकूण ७१ हजार १७७ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली असून, यात सर्वाधिक विक्री खासगी कंपन्यांच्या बियाण्यांची झाली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांकडून खासगी कंपन्यांच्या बियाण्यांची खरेदी महाबीज, एनएससीकडून तुलनेत कमी बियाण्यांचा पुरवठा

नामदेव भोर/नाशिक: जिल्ह्यात खरिपाच्या पार्श्वभूमीवर एकूण ७१ हजार १७७ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली असून, यात सर्वाधिक विक्री खासगी कंपन्यांच्या बियाण्यांची झाली असून, महाबीज व एनएससीच्या बियाण्यांपेक्षा शेतकऱ्यांनी खासगी कंपन्यांच्या बियाण्यांनाच अधिक पसंती दिल्याचे दिसून येत आहे. महाबीजच्या बियाण्यांच्या उगवण क्षमतेच्या बाबतीत वारंवार तक्रारी असल्याने दिवसेंदिवस शेतकऱ्यांचा कल खासगी कंपन्यांचे बियाणे खरेदीकडे वाढत असताना महाबीज व राष्ट्रीय बियाणे महामंडळ शेतकऱ्यांच्या आवश्यक तेनुसार दर्जेदार व गुणवत्तापूर्ण बियाणे पुरविण्यास कमी पडत असल्याचे दिसून येत आहे.  नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९७ हजार १०२ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला असून, त्यापैकी ७१ हजार १७७ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली आहे. परंतु यात ५८ हजार २२४ क्विंटल एवढा सर्वाधिक वाटा खासगी कंपन्यांचा आहे, तर महाबिज केवळ नऊ हजार १८१ व एनएससीच्या तीन हजार ७१० क्विंटल बियाण्यांची विक्री झाली आहे. तुलनेत खासगी कंपन्यांनी बाजारात तब्बल ८१ हजार ९१२ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा केला होता, तर महाबिजने ९ हजार ६९० व एनएससीने ५ हजार ५०० असा एकूण १५ हजार १९० क्विंटल बियाणे पुरवठा केला होेता. म्हणजे खासगी कंपन्यांनी महाबीज अणि एनएससीपेक्षा सुमारे ५.३९ पटीने अधिक पुरवठा करून जवळपास ४.५१ पटीने अधिक विक्री केली आहे. नाशिक जिल्ह्यात प्रामुख्याने सोयाबीन, भात, ज्वारी, बाजरी, मका, नागली, तूर, उडीद, भुईमूग व कापूस यासारखी खरीप पिके घेतली जातात. त्यासाठी जिल्ह्यात महाबीजचे ९ हजार ६९० क्विंटल, राष्ट्रीय बियाणे महामंडळ (एनएससी) ५ हजार ५ क्विंटल व खासगी कंपन्यांकडून ८१ हजार ९१२  क्विंटल असा एकूण ९७ हजार १०२ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला होता. त्यापैकी सुमारे ३१ हजार १५२ क्विंटल बियाणे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविण्यात आले आहेत. परंतु, या योजनेचा लाभ केवळ १९४८ गावांमधील ७ हजार ४९५ गटांना मिळाला असून, गटापासून दूर राहिलेले एकल शेतकरी मात्र थेट बांधावर खते आणि बियाणे योजनेपासून वंचित राहिले आहेत. 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रNashikनाशिकFarmerशेतकरी