शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज : गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 18:33 IST

शेतकऱ्यांनी कृषी मोहत्सव, कृषी मेळावे व कृषीप्रदर्शनांच्या माध्यमातून शेती क्षेत्रात  विकसित होणारे नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरजविपणन आणि व्यवस्थापन कौशल्यही मिळविणे आवश्यक पालकमंत्री गिरीश महाजन यांचे कृषी महोत्सवात प्रतिपादन नाशिक जिल्हा कृषी महोत्सवाचा समारोप

नाशिक : शेतकऱ्यांनी कृषी मोहत्सव, कृषी मेळावे व कृषीप्रदर्शनांच्या माध्यमातून शेती क्षेत्रात  विकसित होणारे नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.अनंत कान्हेरे मैदानावर गेल्या पाच दिवसापासून सुरू असलेल्या नाशिक जिल्हा कृषी महोत्सवाचा रविवारी (दि.25) राज्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत समारोप झाला. यावेळी आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी तुकाराम जगताप, भाजपचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, आत्माचे प्रकल्प संचालक अशोक कांबळे आदी उपस्थित होते. गिरीश महाजन म्हणाले,शेतकऱ्यांनी प्रदर्शनाच्या माध्यमातून नवे तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा शेतात उपयोग करावा. जगभरात लागणारे नवे शोध अशा ठिकाणी पहायला मिळतात. म्हणून शासनाने प्रत्येक जिल्ह्यात असे प्रदर्शन भरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा अधिकाधीक शेतकर्यांनी फायदा करून घेण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी विपणन आणि व्यवस्थापन कौशल्य वापरल्यास त्यांना अधिक लाभ होईल, असेही महाजन यांनी यावेळी सांगितले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते शेती क्षेत्रत उल्लेखणीय कामिगरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच जलयुक्त शिवार अभियान जिल्हास्तरीय समितीद्वारे तयार करण्यात आलेल्या जलदर्शिकेचे प्रकाशनही करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रदर्शनातील विविध दालनांना भेट देऊन वेगवेगळ्य़ा उपकरणांची व कृषी तंत्रज्ञानाची माहिती घेतली. दरम्यान,जिल्हा कृषी प्रदर्शनाला दीड लाखाहून अधिक नागरिक आणि शेतक:यांनी भेट दिली असून सुमारे दीड कोटी रु पयांच्या उत्पादनांची विक्र ी पाच दिवसात झाली. त्याचप्रमाणो 24 शेतकऱ्यांचे वेगवेगळ्य़ा खरेदीदारांसोबत करारही झाल्याची माहिकी आत्माचे प्रकल्प संचालक .अशोक कांबळे यांनी दिली आहे.शेंद्रीय शेतीद्वारे उत्पादनात वाढ शक्यशेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीवर भर दिल्यास शहरातील ग्राहकांना आकर्षित करता येईल आणि शेतमालाला अधिक भाव मिळेल. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी प्रयोगशील असून कौशल्याचा चांगला वापर करीत आहे. शेतकऱ्याला पाणी आणि वीज देऊन शाश्वत शेतीकडे वळविण्याचा प्रयत्न असल्याचे महाजन यांनी सांगितले.

डाळिंब, द्राक्ष पिकांविषयी मार्गदर्शनपाच दिवस चाललेल्या कृषि महोत्सवात विविध चर्चासत्रे व मार्गदर्शन शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात शेवटच्या दिवशी दुपारच्या सत्रत ह्यडाळींब व द्राक्षेह्ण या विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. अहमदनगर जिल्ह्यातील बाबासाहेब गोरे आणि सांगली जिल्ह्यातील प्रा.वसंत माळी यांनी शेतक:यांना डाळिंब व द्राक्ष पिकांविषयी माहिती दिली.

 

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिकGirish Mahajanगिरीश महाजनFarmerशेतकरी