वाडीवऱ्हे येथे शेतकरी मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 01:03 IST2020-12-23T22:20:43+5:302020-12-24T01:03:14+5:30
वाडीवऱ्हे : अस्वली गोंदे आणि वाडीवऱ्हे स्टेट बँकेच्या शाखेच्या वतीने वाडीवऱ्हे येथे शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

वाडीवऱ्हे येथे शेतकरी मेळावा
वाडीवऱ्हे : अस्वली गोंदे आणि वाडीवऱ्हे स्टेट बँकेच्या शाखेच्या वतीने वाडीवऱ्हे येथे शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी वरिष्ठ अधिकारी धनराज देशमुख यांनी सांगितले की, पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना ३ लाखापर्यंत पीक कर्जासाठी लागू असून, ३० जूनपूर्वी परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो. १ लाख रुपयांच्या रकमेला ३ टक्के व्याज सवलत मिळते.
यावेळी अस्वली गोंदे शाखा प्रबंधक राहुल पाटील, वाडीवऱ्हे शाखा प्रबंधक सीमा जगताप यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या मेळाव्याप्रसंगी हरिश्चंद्र लहांगे, बाणेश्वर मालुंजकर, दत्तू नाठे, सजन नाठे, दिनेश करंजकर, कचरू गव्हाणे, प्रल्हाद धांडे आदींसह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.