आमदार राजाभाऊ वाजे व जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या उपस्थितीत झालेल्या शेतकरी मेळाव्यात व्यासपिठावर ज्येष्ठ नेते निवृत्तीमामा डावरे, इफोर्ट कंपनीचे संचालक जे. व्ही. मोहनराव, शबनम हुसेन, तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे, माजी सरपंच नामदेव शिंदे, रामनाथ पावसे, पंचायत समिती सदस्य वेणूबाई डावरे, सोनांबे येथील सरपंच पुष्पा पवार, डुबेरच्या सरपंच सविता वारूंगसे, सुरेश पोरजे, उमेश माचकर आदी उपस्थित होते. इफोर्ट कंपनीचे संचालक जे. व्ही. मोहनराव (आंध्रप्रदेश) यांनी देखील शेतकऱ्यांना पीक व स्वसुरक्षेच्या मुद्यांवर मार्गदर्शन केले. यावेळी आमदार वाजे यांनीदेखील उपस्थित शेतकरी बांधवांसोबत संवाद साधला. यावेळी डॉ. राजेंद्र गोरे, समन्वयक गीता राणी, मंडळ कृषी अधिकारी एम. जी. धांडे, कृषी पर्यवेक्षक राजेंद्र बिन्नर, डी. एस. कोते, राजू दोडके, डी. एस. ढेंगळेसह आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
सोनांबे येथे शेतकरी मेळावा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 18:57 IST