सोनांबे येथे शेतकरी मेळावा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 18:57 IST2019-07-09T18:56:43+5:302019-07-09T18:57:43+5:30

सिन्नर : नाशिक कॉर्टिवा अ‍ॅग्रो सायन्स प्रॉडक्टस लिमिटेड साउथ एशिया कंपनी आणि इफोर्ट कंपनीच्या सहकार्याने शेतकरी सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या इफोर्ट कंपनीतर्फ सिन्नर तालुक्यातील सोनांबे येथे आयोजित शेतकरी मेळावा उत्साहात पार पडला.

 Farmers' meet at Sonambe excitement | सोनांबे येथे शेतकरी मेळावा उत्साहात

सोनांबे येथे शेतकरी मेळावा उत्साहात

आमदार राजाभाऊ वाजे व जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या उपस्थितीत झालेल्या शेतकरी मेळाव्यात व्यासपिठावर ज्येष्ठ नेते निवृत्तीमामा डावरे, इफोर्ट कंपनीचे संचालक जे. व्ही. मोहनराव, शबनम हुसेन, तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे, माजी सरपंच नामदेव शिंदे, रामनाथ पावसे, पंचायत समिती सदस्य वेणूबाई डावरे, सोनांबे येथील सरपंच पुष्पा पवार, डुबेरच्या सरपंच सविता वारूंगसे, सुरेश पोरजे, उमेश माचकर आदी उपस्थित होते. इफोर्ट कंपनीचे संचालक जे. व्ही. मोहनराव (आंध्रप्रदेश) यांनी देखील शेतकऱ्यांना पीक व स्वसुरक्षेच्या मुद्यांवर मार्गदर्शन केले. यावेळी आमदार वाजे यांनीदेखील उपस्थित शेतकरी बांधवांसोबत संवाद साधला. यावेळी डॉ. राजेंद्र गोरे, समन्वयक गीता राणी, मंडळ कृषी अधिकारी एम. जी. धांडे, कृषी पर्यवेक्षक राजेंद्र बिन्नर, डी. एस. कोते, राजू दोडके, डी. एस. ढेंगळेसह आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Web Title:  Farmers' meet at Sonambe excitement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी