राजापूरला शेतकर्यांचा वीज कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 17:24 IST2020-12-25T17:23:42+5:302020-12-25T17:24:06+5:30
अनेक शेतकर्यांच्या उन्हाळ कांदा लागवड सुरू

राजापूरला शेतकर्यांचा वीज कार्यालयावर मोर्चा
राजापूर : येथील महावितरणच्या कार्यालयावर खरवडी, ममदापूर, देवदरी या गावातील शेतकर्यांनी खंडीत वीज प्रश्नी धडक मोर्चा काढला.
महावितरणचे स्थानिक अभियंता हूरपुडे यांची भेट घेत शेतकर्यांनी ममदापूर फीडरला सुरळीत वीजपुरवठा करण्याची मागणी केली. ममदापूर फिडरवर जादा भार असल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडले आहेत. खरवडी, देवदरी, ममदापूर परिसरात अनेक शेतकर्यांच्या उन्हाळ कांदा लागवड सुरू असून वीज पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने पिके धोक्यात येत आहेत.
ममदापूर, खरवडी या दोन ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन नवीन वीज उपकेंद्र उभारण्याची मागणीही शेतकर्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केल्याचे बाळासाहेब दाणे यांनी सांगितले.