शेतकरी सन्मान योजनेचा ६० हजार शेतकऱ्यांना होणार लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 17:52 IST2019-02-14T17:52:01+5:302019-02-14T17:52:43+5:30
सिन्नर : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा तालुक्यातील सुमारे ६० हजार शेतकºयांना लाभ होणार आहे. या योजनेचा शेतकºयांना तातडीने लाभ देण्यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. सुमारे ६० हजार शेतकरी या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरणार असल्याचे तहसीलदार नितीन गवळी यांनी सांगितले.

शेतकरी सन्मान योजनेचा ६० हजार शेतकऱ्यांना होणार लाभ
गावोगावी बुधवारी ग्रामसभा घेण्यात आल्या. या ग्रामसभेत योजनेतील पात्र आणि अपात्र लाभार्थी याद्यांचे नेमलेल्या अधिकाºयांनी वाचन केले. अपवादात्मक स्थितीत नोंदवलेले आक्षेप वगळता सर्वत्र या याद्या जवळपास अंतिम होणार आहेत. तहसीलदार नितीन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली महसूलचे मंडळ अधिकारी, तलाठी, पंचायत समितीचे ग्रामसेवक आणि तालुका कृषी विभागाचे कृषी सहाय्यक हे लाभार्थी शेतकºयांच्या याद्या अंतिम करण्यात कामात आहेत. दोन हेक्टरच्या आतील शेतकºयांना या योजनेचा लाभ दिला जाणार असून तशा याद्याही तयार झाल्या आहेत. ज्या शेतकºयांचे क्षेत्र दोन हेक्टरपेक्षा अधिक आहे, त्या अपात्र शेतकºयांच्या याद्याही तयार करण्यात आल्या आहेत. बुधवारी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक या नेमलेल्या अधिकाºयांनी पात्र आणि अपात्र अशा दोन्ही याद्यांचे वाचन करत शेतकºयांच्या शंकांचे निरसन केले. काही शेतकरी अनावधानाने या योजनेत घेण्याचे राहून गेले त्यांचा समावेश तातडीने करण्यात येणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. दरम्यान, वार्षिक ६ हजार रूपये अनुदानासाठी पात्र असलेल्या सुमारे ८० टक्के शेतकºयांनी त्यांचे बँक खाते, आधार क्रमांक आदी माहिती महसूल विभागास दिली आहे. उर्वरित शेतकºयांची माहिती तातडीने जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे तहसीलदार नितीन गवळी यांनी सांगितले. शासनाने घालून दिलेल्या निकषानुसार जे शेतकरी या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत, मात्र त्यांनी अद्यापही आपले बँक पासबुक, आधारकार्ड तलाठी कार्यालयात जमा केलेले नाहीत, त्यांनी ते तातडीने जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. सिन्नर तालुक्यातील सोनारी, सोनांबे, कोनांबे या गावांत सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, सोसायटी सचिव यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे पात्र-अपात्र लाभार्थी याद्यांचे वाचन करण्यात आले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी अधिकारी, कर्मचाºयांना विविध प्रश्न विचारले. उर्वरित खातेदारांनी आधारकार्ड आणि राष्टÑीयकृत बॅँकेचा खाते नंबर तत्काळ जमा करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.