शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा धारक शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 19:03 IST

मानोरी : आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर या अवकाळी पावसाला तीन महिने उलटूही अद्याप येवला तालुक्यातील पीक विमा धारक शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळाली नसून शेतकऱ्यांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून शेतकरी अद्यापही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

ठळक मुद्देमानोरी : तीन महिन्यानंतरही कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरी : आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर या अवकाळी पावसाला तीन महिने उलटूही अद्याप येवला तालुक्यातील पीक विमा धारक शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळाली नसून शेतकऱ्यांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून शेतकरी अद्यापही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.ज्या शेतकºयांनी पीक विमा काढलेला नाही अशा शेतकºयांना तुटपुंजी का होईना शासनाकडून मदत मिळत असून ज्या शेतकºयांनी पीक विमा काढलेला आहे, अशा शेतकºयांच्या हातात एक दमडी देखील मिळाली नसून संबंधित पीक विमा कंपनीच्या या कारभारावर शेतकरी वर्गाकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पीक विमा न काढलेल्या शेतकºयांना मदत मिळत असताना पीक विमा धारक शेतकरी मात्र नाराजी व्यक्त करीत आहे.यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने मका आणि सोयाबीन पिकांची मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाने लागडव केली होती. त्यात यंदा प्रथमच मक्यावर लष्करी अळीने आक्र मक केल्याने आधीच मक्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना वारंवार विविध प्रकारची औषध फवारणी करून काही प्रमाणात मका पीक शेतकरी वर्गाने वाचविले होते.सन २०१८ मध्ये खरीप हंगामातील मक्याचे आणि सोयाबीनचा पण अनेक शेतकºयांनी पीक विमा काढलेला असताना कोरडा दुष्काळ पडलेला असताना देखील अद्यापही कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई पीक विमा धारक शेतकºयांना मिळालेली नाही. तसेच २०१९ मध्ये पण अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झालेले असताना देखील पीक विमा धारक शेतकरी नुकसान भरपाई च्या प्रतीक्षेत आहे.काही पीक विमा धारक शेतकरी दीड वर्षांपासून तर काही शेतकरी दोन महिन्यांपासून पीक विम्याच्या नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असून शासनाने पीक विमा संबंधित कंपन्यांना याबाबत सखोल माहितीची चौकशी करून शेतकºयांना त्यांच्या हक्काच्या पीक विम्याची नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.लष्करी अळीचे प्रमाण वाढतच गेल्याने अनेक शेतकºयांनी मका पीक हातातून जाते की काय या भीतीने प्रधानमंत्री पीक विमा काढला होता. अवकाळी पाऊस झाल्यानंतर एका रात्रीतून पिकांची अवस्था होत्याची नव्हती झाली होती. मका, सोयाबीन पेरणीसाठी घेतलेली बियाणे, रासायनिक खते, मशागतीचा खर्च, औषध फवारणीचा हजारो रु पये खर्च करून देखील अवकाळी पावसाने नुकसान झाल्याने हा सर्व खर्च अवकाळी पावसाने वाहून नेला होता.येवला तालुक्यात सन २०१८ मध्ये कोरडा दुष्काळ पडला असता मका पीक पाण्याच्या कमतरतेमुळे वाया गेले होते. तेव्हा पण मी पीक विमा काढलेला होता. तसेच २०१९ मध्ये अवकाळी पावसाने मका, सोयाबीनचे नुकसान झालेले असताना तेव्हा पण मी पीक विमा काढलेला आहे. मात्र दोन्ही पण वर्षी एक रु पयांची देखील नुकसान भरपाई पीक विमा कंपनीकडून अद्याप मला मिळालेली नाही.- विठ्ठल वावधाने, पीक विमा धारक शेतकरी.(फोटो ०१ मानोरी, ०१ मानोरी २)आॅक्टोबर महिन्यात अवकाळी पावसाने झालेले पिकांचे नुकसान.

टॅग्स :LIC - Life Insurance CorporationएलआयसीFarmerशेतकरी