शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची गरज

By admin | Updated: September 25, 2015 00:12 IST

जायखेडा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांची धावती भेट

जायखेडा : शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येला नैसर्गिक आपत्ती व शासनाचे शेतीविषयक चूक धोरण जितके जबाबदार आहे तितकीच जबाबदार आपली संपूर्ण व्यवस्था असून, ही व्यवस्था बदलण्याबरोबरच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून त्यांना संपूर्ण कर्ज मुक्त केले पाहिजे व त्यांना जगण्याची संधी दिली पाहिजे, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी आपल्या धावत्या दौऱ्यादरम्यान जायखेडा, सोमपूर येथे भेट देऊन शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. यावेळी ठिकठिकाणी खासदार राजू शेट्टीचा सत्कार करण्यात आला. जायखेडा येथील ग्रामपंचायत सभागृहात स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व ग्रामपंचायतीमार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच जयश्री बच्छाव, उपसरपंच संजय मोरे, ज्येष्ठ नेते पंडित मोरे, सोमनाथ ब्राह्मणकार, पं. स. सदस्य लक्ष्मण सोनवणे, अनिल आहिरे, शांताराम आहिरे, अशोक जगताप, संजय बच्छाव, निंबा मोहिते, बापू खुडाणकर, शिवाजी कापडणीस, शरद धिवरे, आदिंसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. यानंतर सोमपूर येथील साईबाबा मंदिराच्या प्रांगणात उपस्थित शेतकऱ्यांशी खासदार शेट्टी यांनी संवाद साधला.सत्तापरिवर्तन करून नवीन सरकार सत्तेत आणले खरे मात्र त्यांनीही शेतकऱ्यांचा भ्रमनिराश केला. शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्ज मुक्त करण्यासाठी व्यापक मोहीम राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिक जिल्हा शेतकरी चळवळीचे उगमस्थान असल्याने या आंदोलनात महाराष्ट्राचे नेतृत्व नाशिक जिल्ह्याने करावे, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी सोमपूर, तांदूळवाडी, भडाणे, नांदिन व परिसरातील शेतकऱ्यांनी विविध समस्यांची निवेदने दिली. यावेळी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्रप्रमुख दीपक पगार, योगेश भामरे, जालिंदर पाटील, गिरीश भामरे, जगदीश इनामदार, डॉ, भास्कर भामरे, अ‍ॅड. नाना भामरे, सचिन भामरे, गोविंद पगार, संजय भामरे, दत्ता पवार, संजय वाघ, दीपक भामरे, राकेश बोरसे, प्रशांत भामरे, विजय भामरे, धनंजय भामरे, आनिल शिंदे, बाळासाहेब भामरे आदिंसह शेतकरी बांधव उपस्थित होते. (वार्ताहर)