Farmers' Day celebrated at Satali | साताळी येथे शेतकरी दिन साजरा

साताळी येथे शेतकरी दिन साजरा

ठळक मुद्देशासनाच्या कृषी विभागाच्या विविध योजनांची माहीती यावेळी शेतकऱ्यांना दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : तालुक्यातील साताळी ग्रामपंचायतीत सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांची जयंती शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यात आली.
प्रारंभी सहकारमहर्षी विखे पाटील यांचे प्रतिमे पूजन सरपंच भाऊसाहेब कळसकर यांचे हस्ते करण्यात आले. कृषी पर्यवेक्षक नाईकवाडे, कृषी सहायक सोमनाथ काळे यांनी शासनाच्या कृषी विभागाच्या विविध योजनांची माहीती यावेळी शेतकऱ्यांना दिली.
कार्यक्र मास परसराम काळे, रामकिसन कोकाटे, अरूण कोकाटे, दत्तात्रय खराटे, साहेबराव कोकाटे, वसंत मोरे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Farmers' Day celebrated at Satali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.