शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व्हावी : धीरजकुमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 00:33 IST2020-10-30T21:33:48+5:302020-10-31T00:33:52+5:30
नांदूरशिंगोटे : शासनाच्या धोरणानुसार शेतकऱ्यांचा शेतमाल थेट ग्राहकांच्या दारापर्यंत गेल्यास त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहेत. त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांनी याबाबत विचार करणे गरजेचे आहे. आधुनिक शेतीकडे शेतकऱ्यांचा असलेला कल निश्चितच फलदायी असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी मांडले.

शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व्हावी : धीरजकुमार
नांदूरशिंगोटे : शासनाच्या धोरणानुसार शेतकऱ्यांचा शेतमाल थेट ग्राहकांच्या दारापर्यंत गेल्यास त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहेत. त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांनी याबाबत विचार करणे गरजेचे आहे. आधुनिक शेतीकडे शेतकऱ्यांचा असलेला कल निश्चितच फलदायी असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी मांडले. नांदूरशिंगोटे येथील शेतकऱ्यांच्या बांधावर त्यांनी भेट दिली असता ते बोलत होते. धीरजकुमार दोन दिवस नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून, दौऱ्याची सुरुवात नांदूरशिंगोटे येथून झाली. संजय आव्हाड यांच्या शेतीस आयुक्त धीरजकुमार यांनी भेट दिली. त्यांच्या शेतातील शेवगा, कांदा, ब्रोकोली आदी पिकांची पाहणी करत आर्थिक गणित समजावून घेतले. शेतकऱ्यांना मार्केटिंग करतानाच्या समस्या आणि त्यावरील उपाय यावर त्यांनी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी दोडी बु. येथील शेतमॉल शेतकरी उत्पादक कंपनीस भेट दिली. कंपनीचे संचालक गणपत केदार आणि सुकदेव आव्हाड यांनी कंपनीचे उपक्रम साांगितले. कोरोनाच्या काळात बांधावर खत वितरण, रासायनिक खते व औषधे विक्री व्यवस्था, मुंबई येथे मंत्रालय परिसरातील संत सावतामाळी आठवडे बाजार आदीबाबत माहिती दिली. लोणारवाडी येथील देवनदी व्हॅली शेतकरी कंपनीच्या भाजीपाला संकलन केंद्राचा शुभारंभ आयुक्त धीरजकुमार यांच्या हस्ते झाला. कंपनीचे संचालक अनिल शिंदे यांनी कंपनीच्या कार्याबाबत माहिती दिली. यात टाटा आणि देवनदी कंपनी यामध्ये टमाटा खरेदी-विक्री सामंजस्य करार, शेतमाल खरेदी सुविधा, शेतीनिविष्ठा विक्री आणि युवा मित्रांगण यांचे सहकार्याबाबत माहिती दिली. तसेच संंचालक भागवत बलक, वसुंधरा सेंद्रिय शेतकरी उत्पादक कंपनी यांनी त्यांनी निर्माण केलेली सेंद्रिय भाजीपाला विक्री व्यवस्था सांगितली.