शहरं
Join us  
Trending Stories
1
११ युवकांचं ब्रेनवॉश करण्यासाठी... ; दिल्ली स्फोटातील दहशतवादी डॉ. उमरबाबत आणखी धक्कादायक माहिती उघड
2
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
3
काल हिडमाचा खात्मा, आज ‘टेक शंकर’सह 7 नक्षलवादी ठार; आंध्र-ओडिशा सीमेजवळ भीषण चकमक
4
संरक्षण, विमा आणि धातू क्षेत्रातील 'या' ५ कंपन्यांचे शेअर्स येणार तेजीत! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज
5
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
6
‘ही मुलगी आमच्या मुलाची नाही’, सासू-सासरे सारखा घ्यायचे संशय, संतप्त सुनेने केलं भयंकर कृत्य
7
Rinku Singh Century In Ranji Trophy : टी-२० स्टार रिंकू सिंहचा रेड बॉल क्रिकेटमध्ये शतकी धमाका!
8
आता काळ बदलतोय! घर सांभाळण्यासाठी कपलने ठेवला 'होम मॅनेजर'; महिन्याला १ लाख पगार
9
हृदयद्रावक! डीजेवर नाचताना हवेत गोळीबार; नवरदेवाच्या मित्राच्या मुलीने गमावला जीव
10
५४ तास विपरीत महालक्ष्मी राजयोग: ५ राशींना ४ पट लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; अकल्पनीय फायदा!
11
'इंग्लिश विंग्लिश'मधली छोटी मुलगी आता दिसते सुंदर; अभिनेत्रीचं अरेंज मॅरेज ठरलं; म्हणाली...
12
रशियाने भारताला दिली एक खतरनाक ऑफर, पाकिस्तानचं टेन्शन वाढलं, आली डोळे पांढरे होण्याची वेळ
13
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
14
'AI वर आंधळा विश्वास ठेवू नका; यातील गुंतवणुकीचा फुगा कधीही फुटू शकतो' सुंदर पिचाईं यांचा इशारा!
15
Numerology 2026: अंकशास्त्रानुसार २०२६ हे इच्छापूर्तीचे वर्ष? कोणते बदल केले पाहिजेत?
16
एक गावात अन् दुसरी शहरात, एका कॉलनं पतीचं गुपित उघडलं; २ बायकांचा धनी जेलमध्ये गेला, काय घडलं?
17
"मुलाच्या मनात माझा आदर वाढेल"; डिनर पार्टीत ट्रम्प यांनी रोनाल्डोसोबत शेअर केला घरातला खास किस्सा
18
Nashik: नाशकात कडाक्याच्या थंडीत भल्या पहाटे सैन्यभरतीसाठी तरुणाई मैदानात!
19
Mumbai Airport: मुंबई विमानतळ २० नोव्हेंबर रोजी ६ तास बंद राहणार, कारण काय?
20
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्ष तपासणीच्या नावाखाली उत्पादकांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 15:10 IST

द्राक्ष उत्पादक शेतक-यांना निर्यातदारांकडून विशिष्ट प्रयोगशाळेची अट घातली जात आहे. तसेच प्रयोगशाळांकडून शेतक-यांना रासायनिक अवशेष तपासणी अहवाल मिळत नसल्याचीही शेतक-यांची तक्रार आहे. रासायनिक अंशाचे प्रमाण अधिक असल्याची बतावणी करत व्यापारी कमी भावाने द्राक्ष खरेदी करत आहेत.

ठळक मुद्देछगन भुजबळ यांनी लक्ष वेधले : कृषीमंंत्र्यांना लिहीले पत्र तपासणी अहवालाची माहिती शेतक-यांना एसएमएस, व्हाटसअ‍ॅप, ई-मेल वर मिळत नाही

नाशिक : द्राक्ष उत्पादक शेतक-यांच्या द्राक्ष रासायनिक अवशेष तपासणी अहवालाची माहिती शेतक-यांना एसएमएस, व्हाटसअ‍ॅप, ई-मेल वर मिळत नसल्याने शेतक-यांची फसवणूक होत असून, निर्यातदारांकडून काही विशिष्ट प्रयोगशाळेतूनच द्राक्षाची चाचणी करण्याचा आग्रह धरतात व या प्रयोगशाळा परस्पर निर्यातदारांना त्याचा अहवाल पाठवित असल्याने द्राक्ष उत्पादक शेतक-यांची मोठी फसवणूक होत आहे. त्यामुळे शेतक-यांना एसएमएस, व्हाटसअ‍ॅप, ई-मेलवर तपासणी अहवाल मिळावे अशा मागणीचे पत्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर यांना दिले आहे.छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, द्राक्ष उत्पादक शेतक-यांना निर्यातदारांकडून विशिष्ट प्रयोगशाळेची अट घातली जात आहे. तसेच प्रयोगशाळांकडून शेतक-यांना रासायनिक अवशेष तपासणी अहवाल मिळत नसल्याचीही शेतक-यांची तक्रार आहे. रासायनिक अंशाचे प्रमाण अधिक असल्याची बतावणी करत व्यापारी कमी भावाने द्राक्ष खरेदी करत आहेत. परिणामी व्यापा-यांकडून फसवणूक होत असल्याची शेतक-यांच्या तक्रारी आहेत. नाशिक जिल्ह्यात तीस हजारांहून अधिक द्राक्ष निर्यातदार शेतकरी असून या शेतक-यांची द्राक्षे परदेशात जात असतात. युरोपमध्ये द्राक्षाला अधिक भाव मिळत असल्याने आपली द्राक्षे युरोपमध्येच जावीत अशी प्रत्येक शेतक-याची भावना आहे. त्यासाठी द्राक्षाचा अंशदर कमीत कमी असणे गरजेचे असते, मात्र प्रयोगशाळांकडून तपासणीचा अहवाल शेतक-यांना न पाठवता निर्यातदार व्यापा-यांना पाठवला जात असल्यामुळे व्यापारी सांगतील तसा अंशदर शेतक-यांना मान्य करावा लागून याचाच फायदा व्यापारी उठवत आहेत.द्राक्षांमध्ये अंशदर अधिक असून तुमची द्राक्षे युरोपला जाऊ शकत नसल्याचे सांगून युरोपऐवजी इतर देशात तुमची द्राक्षे पाठवावी लागतील अशी बतावणी करत व्यापारी द्राक्षांचे भाव पाडत आहेत. त्यामुळे द्राक्षांचे रासायनिक अवशेष तपासणी अहवाल व्यापा-यांसोबतच शेतक-यांना त्यांच्या मोबाईलवर, व्हॉटसअ‍ॅपवर वा ई-मेलवर मिळावे अशी शेतक-यांची मागणी आहे. तरी,सदर प्रकरणी वैयक्तिकरित्या लक्ष घालून द्राक्ष निर्यातदार शेतक-यांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावे अशी मागणी छगन भुजबळ यांनी आपल्या पत्रात केलेली आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक