शेतकऱ्याची पाच लाखांनी फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 00:55 IST2021-06-16T23:34:51+5:302021-06-17T00:55:43+5:30
कसबे सुकेणे : येथील एका शेतकऱ्याची अज्ञात संशयिताने तोतयेगिरी करीत बँक खात्याची फोनद्वारे माहिती घेऊन तब्बल ४ लाख ९१ हजार रुपये खात्यातून परस्पर काढून फसवणूक केल्याची घटना घडली आहे.

शेतकऱ्याची पाच लाखांनी फसवणूक
कसबे सुकेणे : येथील एका शेतकऱ्याची अज्ञात संशयिताने तोतयेगिरी करीत बँक खात्याची फोनद्वारे माहिती घेऊन तब्बल ४ लाख ९१ हजार रुपये खात्यातून परस्पर काढून फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याबाबत ओझर पोलीस ठाण्यात ठगबाजीचा गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती ओझर पोलिसांनी दिली.
कसबे सुकेणे येथील भगीरथ दत्तू तिडके (३०) रा. तिडके वस्ती यांना अज्ञात भामट्याने तोतयेगिरी करून आपण फोन पे अप्लिकेशन कस्टमर केअर असल्याचे सांगून बँक खात्याची माहिती घेतली व खात्यातून ४ लाख ९१ हजार ५४७ रुपये परस्पर काढून घेतले. दरम्यान, भगीरथ तिडके यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी कसबे सुकेणे व ओझर पोलीस ठाणे गाठून फसवणुकीची फिर्याद दिली. ओझर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध ठगबाजीचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक रहाते यांनी दिली.