शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
4
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
6
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
7
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
8
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
9
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
10
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
11
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
12
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
13
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
14
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
15
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
16
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
17
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
18
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
19
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे दिवाळे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2019 00:44 IST

जिल्ह्यात परतीच्या पावसाने द्राक्षे, मका, बाजरी, सोयबीन, टमाटे आदी पिकांसह कांदा रोपांचे नुकसान झाल्याने शेतकरी हादरला असून, ऐन सणासुदीच्या दिवसात हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले आहे. शासनाने नुकसानीचे पंचनामे करून संबंधित शेतकºयांना भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकºयांकडून केली जात आहे.

नाशिक : जिल्ह्यात परतीच्या पावसाने द्राक्षे, मका, बाजरी, सोयबीन, टमाटे आदी पिकांसह कांदा रोपांचे नुकसान झाल्याने शेतकरी हादरला असून, ऐन सणासुदीच्या दिवसात हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले आहे. शासनाने नुकसानीचे पंचनामे करून संबंधित शेतकºयांना भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकºयांकडून केली जात आहे.नांदूरशिंगोटे परिसरात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने थैमान घातल्याने खरीप हंगामील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीन, बाजरीचे पीक पाण्यावरती तरंगत असून, शेतकºयांना आर्थिक फटका बसला आहे. परिसरातील नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरीवर्गाकडून केली जात आहे.परिसरातील सोयाबीन पीक सोंगणीसाठी आले असून, काही शेतकºयांनी सोयाबीनची सोंगणी केली आहे. मात्र, गेल्या आठवड्यात सातत्याने पाऊस सुरू असल्याने शेतकºयांना सोंगलेले पीक शेताबाहेर काढणेही अवघड होऊन बसले आहे. पडून असलेल्या सोयाबीनच्या शेंगांना शेतातच मोड फुटू लागले आहेत. मक्याच्या कणसांना मोड फुटल्याने शेतकरी चिंतित आहे. शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिरावला गेल्याने शेतकºयांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.आठ दिवसांपासून परिसरात शेतकºयांच्या पिकांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. दिवाळीत कांदा लागवडीला सुरुवात होते. मात्र पावसामुळे कांदा लागवडी लांबणीवर पडली आहे. कांदा रोपे शेतातच सडली आहेत. ठिकठिकाणी शेतकºयांच्या शेतात पाण्याचे तळे तयार झाले आहे. डोंगर पायथ्याशी असलेल्या जमिनीत पाणीचपाणी झाले आहे. शेतातील पाण्याचा निचरा होत नसल्याने अजून काही दिवस शेतात जाणे अवघड होऊन बसले आहे. महसूल व कृषी विभागाच्या अधिकाºयांनी नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून भरपाई देण्याची मागणी शेतकºयांकडून होत आहे.खर्डे व परिसरात गेल्या दहा-बारा दिवसांपासून सुरू असलेला पाऊस व धुके यामुळे मका, कांदा, द्राक्ष तसेच कांदा रोपे आदी पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरीवर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. या नुकसानग्रस्त भागाची कृषी विभागाने पाहणी करून पंचनामे करावेत व नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होतआहे.देवळा तालुक्यात गेल्या दहा-बारा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कापणी करून शेतात ठेवलेल्या मका व बाजरीच्या कणसांना कोंब फुटत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. उन्हाळी व लाल कांद्याची रोपे ढगाळ वातावरणामुळे पूर्णत: खराब झाल्यामुळे शेतकºयांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. तालुक्यात गेल्या वर्षी पाणीटंचाईमुळे उन्हाळी कांद्याच्या क्षेत्रात घट झाल्याने कांद्याच्या दरात वाढ झाली होती.यावर्षी पाऊस चांगला झाल्याने शेतकºयांनी महागडी कांदा बियाणे टाकली; मात्र सततच्या पावसामुळे ही कांदा रोपे पूर्णत: खराब झाल्याने शेतकरीवर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. कांदा रोपांबरोबरच द्राक्ष, टमाटे आदी पिकांचे नुकसान झाल्याने ऐन दिवाळीत शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बाजारपेठेवरदेखील याचा परिणाम जाणत आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकरीवर्गामुळे ग्रामीण भागात दिवाळी सणात निरुत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बाहेरगावाहून आलेल्या मजूरवर्गालादेखील या पावसाचा फटका बसला आहे.दुहेरी-तिहेरी संकटात सापडलेल्या शेतकºयांना शासनाकडून दिलासा मिळाला, अशी मागणी जोर धरू लागली आहे. संबंधित कृषी विभागाने याची दखल घेऊन झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकºयांकडून केली जात आहे.खेडलेझुंगे परिसरात पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आणि ढगाळ हवामानामुळे निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक हवालदिल झाले आहेत. फुलोºयातील डाळिंब व काढणीला आलेले डाळिंब यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. डाळिंबांना काळे डाग पडत आहेत. त्यामुळे एक्सपोर्टसाठी तयार केलेला मालाची स्थानिक बाजारातच मातीमोल भावात विक्री करावी लागणार आहे. झेंडू फुले उत्पादकांचेही नुकसान झाले आहे. नवरात्रोत्सवात जी फुले स्थानिक बाजारात ५० रु पये किलोच्या भावाने विकली गेली, तीच फुले मार्केटमध्ये १०० ते १५० रु पये क्विंटलने लिलाव झाल्याने शेतकºयांनी फुले सोडून दिली आहेत.निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे, रु ई, धारणगाव, कोळगाव, सारोळे परिसरात शेकडो एकरवरील द्राक्षबागा सध्या फुलोरा आणि पोंगा अवस्थेत आहेत. पावसामुळे द्राक्षबागांवर डावणी आणि भुरी रोगाचे आक्र मण होऊ नये, यासाठी शेतकरी दिवसभर बुरशीनाशकांची फवारणी करताना दिसत आहे. परिसरातील बागांची छाटणी जवळजवळ पूर्ण झाली आहे. त्यातील बहुतांश बागा व फुलोरा अवस्थेत आहेत. द्राक्षबागांना छाटणीनंतर पालवी फुटत आहे. कुठे डिपिंगची कामे सुरू आहे; परंतु सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. जोरदार वाºयामुळे शेंडेगळ होत आहे. द्राक्ष घडनिर्मितीच्या दृष्टीनेही अवस्था नाजूक समजली जाते.फुलोरा अवस्थेत बागा संकटात सापडलेल्या आहेत. सोनाका, माणिक, चमन, सुधाकर वाणाच्या द्राक्षबागांत फूलगळ होण्याची भीती आहे. शेतकºयांना गेल्या पंधरवड्यापासून सलग बुरशीनाशक फवारणी करावी लागत आहे. सध्याच्या वातावरणामुळे कृषी केंद्रावर कीटकनाशके खरेदी करण्यासाठी शेतकरी गर्दी करीत आहेत.दिंडोरी तालुक्यात द्राक्षबागांचे नुकसानपांडाणे : परतीच्या पावसामुळे दिंडोरी तालुक्यातील अंबानेर शिवारातील द्राक्षबागांची मोठ्या प्रमाणात हानी झाली असून. आजपर्यंत केलेला खर्च वाया गेल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. अंबानेर येथील चंद्रकांत बोरसे, अशोक घुगे यांच्या द्राक्षबागेची गोडाबार छाटणी करून रुपये दोन लाखांच्या वर नुकसान झाले आहे. अशोक भिकाजी घुगे व किरण घुले यांचेही नुकसान झाले आहे. १ सप्टेंबरला द्राक्ष पिकाची गोडाबार छाटणी केली होती. सुरुवातीला पावसाची उघडझाप असल्यामुळे द्राक्षाचे पोंगा अवस्थेमधून बाग पास झाली. तेथूनच फुलोºयापर्यंत पावसापासून बाग वाचविली; परंतु आता परतीच्या पावसामुळे द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. संबंधित विभागाने तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी बागायतदार शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीWaterपाणीagricultureशेती