वरु णराजाने डोळे वटारल्याने शेतकरी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 05:20 PM2020-06-22T17:20:43+5:302020-06-22T17:21:01+5:30

वरखेडा : दिंडोरी तालुक्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वरु णराजाने डोळे वटारल्याने शेतकरी चिंताग्रस्त दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली होती. मशागत झाली पंरतू पेरण्या खोळंबल्यांने तालुक्यातील शेतकरी आकाशाकडे नजरा लावून बसले आहेत.

Farmers are worried as Varun Raja rolled his eyes | वरु णराजाने डोळे वटारल्याने शेतकरी चिंताग्रस्त

वरु णराजाने डोळे वटारल्याने शेतकरी चिंताग्रस्त

Next
ठळक मुद्दे पेरणीपूर्व मशागतीची कामे करण्यात मग्न

वरखेडा : दिंडोरी तालुक्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वरु णराजाने डोळे वटारल्याने शेतकरी चिंताग्रस्त दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली होती. मशागत झाली पंरतू पेरण्या खोळंबल्यांने तालुक्यातील शेतकरी आकाशाकडे नजरा लावून बसले आहेत.
शेतकरी खरीप हंगामाच्या पिकांच्या लागवडीसाठी पेरणीपूर्व मशागतीची कामे करण्यात मग्न दिसत आहे. तालुक्यात केवळ २५ ते ३० टक्के पेरणी करण्यात आली आहे. तसेच पूर्व भागांमध्ये टोमॅटो, फ्लॉवर, कोबी,भाजीपाला व इतर पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. या पिकांची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी रोपवाटिकेमध्ये रोपांची बुकींग केली आहे. एका बाजूला कोरोनाची धास्ती तर दुसºया बाजूला पाऊस पडत नसल्याने दोन्ही बाजूने शेतकऱ्यांची कोंडी होत आहे.
अवकाळी पावसाने हजेरी लावली परंतू मोसमी पावसाची गरज भासत आहे. तालुक्याच्या काही भागातच अधिक पाऊस पडल्याने आता शेतकरी पुन्हा एकदा पावसाच्या प्रतीक्षेत दिसत असून आकाशाकडे नजरा लावून बसला आहे.

(फोटो २२ वरखेडा)
दिंडोरी तालुक्यातील वरखेडा परिसरात पेरणी करताना महिला.

Web Title: Farmers are worried as Varun Raja rolled his eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.