शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ हवामान, धुके अन् पावसाळी वातावरणामुळे शेतकरी वर्ग चिंतातुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 17:51 IST

खामखेडा : गेल्या दोन- तीन दिवसांपासून खामखेडा परिसरात ढगाळ, धुके व पाऊसाचे वातावरण तयार झाल्याने शेतकरी वर्ग चिंतातुर झाला आहे. चालू वर्षी खरीप हंगामातील पिके परतीच्या व अवकाळी पाऊसाने शेतकऱ्याचा शेतातील मका, बाजरी व लाल कांद्यासह उन्हाळी कांद्याच्या रोपांचे मोठे नुकसान केले होते. तरीही शेतकºयाने नव्याने उन्हाळी कांद्याचे बियाणे आणून कांद्याचे रोपे तयार केली. काही शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याची लागवड केली आहे.

ठळक मुद्देलागवडीसाठी तयार असलेले उन्हाळी कांद्याचे रोपही चागली तयार झाली आहेत.

खामखेडा : गेल्या दोन- तीन दिवसांपासून खामखेडा परिसरात ढगाळ, धुके व पाऊसाचे वातावरण तयार झाल्याने शेतकरी वर्ग चिंतातुर झाला आहे.चालू वर्षी खरीप हंगामातील पिके परतीच्या व अवकाळी पाऊसाने शेतकऱ्याचा शेतातील मका, बाजरी व लाल कांद्यासह उन्हाळी कांद्याच्या रोपांचे मोठे नुकसान केले होते. तरीही शेतकºयाने नव्याने उन्हाळी कांद्याचे बियाणे आणून कांद्याचे रोपे तयार केली. काही शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याची लागवड केली आहे.तर काही उन्हाळी कांद्याचे रोपे लागवडसाठी तयार झाली आहेत. ज्या शेतकºयांनी लवकर उन्हाळी कांद्याची लागवड केली आहे. ते कांद्याचे पीक जोमात आहेत. तसेच लागवडीसाठी तयार असलेले उन्हाळी कांद्याचे रोपही चागली तयार झाली आहेत.उन्हाळी कांद्याच्या बियाण्याचे वाढलेल्या भाव व रोपाच्या तुटवड्यामुळे शेतकºयाने गव्हू व मका पिकाची लागवड केली आहे. त्यामुळे या वर्षी मका व गव्हूच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्याच बरोबर काही शेतकºयांनी भाजीपाला वर्गीय पिकाची लागवड केलेली आहे.गव्हू व भाजीपालाची पिके जोमात आहेत. परंतु गेल्या दोन- तीन दिवसांपासून सर्वत्र ढगाळ व धुक्याच्या वातावरणामुळे कांद्याचे पीक पिवळी पडून त्यांच्या मावा व करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे.त्यामुळे शेतकरीकांदा पिकावर महागडी अशी औषदाची फवारणी करीत आहे. या ढगाळ व धुकत वातावरणामुळे कांद्याची रोपेची अग्रभागी पिवळी पडून मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कांद्याची रोपे मोठ्या प्रमाणात मरू लागली आहेत.या वर्षी गव्हू, मका व भाजीपाला पिकात वाढ झाली आहेत. परंतु या ढगाळ व धुकत वातावरणामुळे गव्हाच्या पिकावर तंबूरा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता शेतकरी वर्गाकडून वर्तवण्यात येत आहे. यामुळे गव्हाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. तसेच भाजीपाला पिकावर मावा रोगामुळे भाजीपाला पिकाची वाढ खुंटते.चौकट....गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पाऊसामुळे कांदा, गव्हू, मका पिकावर विविध रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊन कांदा पीक नामशेष होणार की काय याची भीती शेतकरी वर्गा निर्माण झाल्याने सध्या या ढगाळ व पाऊसाजन्य वातावरणामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा