शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आंदोलनात उभी फूट : नाशिक 1 मार्चच्या संपातून बाहेर, सूकाणू सदस्यांचा समिती विसर्जित केल्याचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 14:57 IST

पुनतांब्यांच्या समितीने 3 जूनच्या मध्यरात्री मुख्यमंत्र्यांसोबत संपातून माघार घेतल्यानंतरही नाशिकच्या शेतकऱ्यांनी पुढे हा संप पुढे नेटाने चालवत सूकाणू समितीची स्थापना केली होती. पंरतु, आता नाशिकमधीलच एका गटाने 1 जानेवारी 2018ला सूकाणू समितीच्या राज्यस्तरीय बैठकीचे नियोजन केले असताना दुसऱ्या गटाने सूकाणू समितीती विसर्जित करीत असल्याची घोषणा केली आहे.

ठळक मुद्देशेतकरी आंदोलनात विविध चढउतारानंतर उभी फूट सूकाणू समितीती विसर्जित करीत असल्याची घोषणा 1 मार्च 2018 च्या संपातून नाशिक बाहेर नुकसान टाळण्यासाठी संप हाणून पाडण्याचा इशारा

नाशिक : पुनतांबे येथील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या 1 जूनपासूनच्या शेतकरी संपाच्या माध्यमातून राज्यभरात उभे राहिलेल्या आंदोलनात विविध टप्प्यावर चढउतारानंतर अखेर उभी फूट पडली आहे. पुनतांब्यांच्या समितीने 3 जूनच्या मध्यरात्री मुख्यमंत्र्यांसोबत संपातून माघार घेतल्यानंतरही नाशिकच्या शेतकऱ्यांनी पुढे हा संप पुढे नेटाने चालवत सूकाणू समितीची स्थापना केली होती. पंरतु, आता नाशिकमधीलच एका गटाने 1 जानेवारी 2018ला सूकाणू समितीच्या राज्यस्तरीय बैठकीचे नियोजन केले असताना दुसऱ्या गटाने सूकाणू समितीती विसर्जित करीत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आंदोलनाचे केंद्र बनलेल्या नाशिकमधूनच शनिवारी (दि.30) शेतकरी आंदोलनात उभी फूट पडली आहे.पंडित कॉलनीत झालेल्या बैठकीत सुकाणू समिती सदस्य हंजराज वडघुले, अमृता पवार, चंद्रकांत बनकर कैलास खांडबहाले यांनी विविध शेतकरी संघटनांसह सामाजिक संघटनांची बैठक घेऊन सूकाणू समिती विसर्जित करण्यात येत असल्याचा निर्णय जाहीर केला. तसेच औरंगाबाद येथील बैठकीत झालेल्या 1 मार्चपासून संप पुकारण्याच्या निर्णयालाही या बैठकीत विरोध करण्यात आला आहे. पुणतांबे येथील येथील शिष्ट्मंडळाने शासनाशी केलेली तडजोड मान्य न झाल्याने नशिक येथील संयोजने समितीने निर्णायक बैठक घेऊन शेतकऱ्यांचे आंदोलन पुढे नेण्याचा आणि या आंदोलनाचा राज्यव्यापी करण्याचा निर्धार करीत 5 जून 2017 रोजी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करून सूकाणू समितीची स्थापना केली होती. या समितीच्या प्रयत्नातू शासनाला अंशता का होईना कजर्मुक्ती देण्यास भाग पाडल्याचा दावा या समितीच्या सदस्यांनी केला आहे. परंतु, नजिकच्या काळात सुकाणू समितीचे कामकाज दिशाहीन झाल्याची कबुलीही देत समितीच्या सदस्यांनी मूळ संयोजन समिती, कार्यकर्ते यांना विश्वासात न घेता काही ठराविक संधीसाधू व्यक्ती निर्णय जाहीर करीत असल्याने आंदोलनाची मूळ संयोजन समिती म्हणून राज्याची सूकाणू समिती विसर्जित करण्यात आल्याचे घोषित केले.

 

टॅग्स :FarmerशेतकरीagitationआंदोलनNashikनाशिक