शेतकऱ्याने फिरविला कोबीवर ट्रॅक्टर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 00:27 IST2020-04-17T20:29:57+5:302020-04-18T00:27:29+5:30
नांदूरवैद्य : सध्या कोरोनामुळे व्यापाऱ्यांसह ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरविल्याने नाशिक तालुक्यातील अनेक शेतकºयांचा कोबी, टमाटे, फ्लॉवर आदी माल कवडीमोल दर मिळत असल्यामुळे शेतातच पडून आहे. याच पार्श्वभूमीवर लोहशिंगवे येथील सुनील जैन या शेतकºयाने दर मिळत नसल्याने आपल्या शेतातील एक एकर कोबीवर ट्रॅक्टर फिरवित पीक भुईसपाट केले.

शेतकऱ्याने फिरविला कोबीवर ट्रॅक्टर !
नांदूरवैद्य : सध्या कोरोनामुळे व्यापाऱ्यांसह ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरविल्याने नाशिक तालुक्यातील अनेक शेतकºयांचा कोबी, टमाटे, फ्लॉवर आदी माल कवडीमोल दर मिळत असल्यामुळे शेतातच पडून आहे. याच पार्श्वभूमीवर लोहशिंगवे येथील सुनील जैन या शेतकºयाने दर मिळत नसल्याने आपल्या शेतातील एक एकर कोबीवर ट्रॅक्टर फिरवित पीक भुईसपाट केले.
यावर्षी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने विहिरींना पाणी उपलब्ध होते, मात्र आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने खरीप हंगाम वाया गेला. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या परिसरात अनेक शेतकºयांनी भाजीपाल्याचे उत्पन्न घेतले, मात्र या भाजीपाल्याला बाजारात कवडीमोल किंमत मिळत असल्याने पिकांसाठी केलेला खर्चही वसूल होत नसल्यामुळे शेतकरी वर्ग हैराण झाला आहे.
या परिसरातील शेतकºयांनी बियाणे, कीटकनाशके तसेच मजूरांवर हजारो रुपये खर्च केला असून, या भाजीपाल्याला दर मिळत नसल्यामुळे लोहशिंगवे येथील सुनील
जैन या शेतकºयाने मेटाकुटीला येत एक एकर शेतामध्ये विक्र ीस
आलेल्या कोबीच्या शेतीत ट्रॅक्टरद्वारे रोटोव्हेटर फिरवत कोबी भुईसपाट केली आहे.
शेतीला भांडवल व चार पैसे हातात मिळावे म्हणून शेतकरी वर्ग कर्जबाजारी झाला असतानाही शेतकºयांनी उधार उसनवारी करीत प्रसंगी कारभारणीचे सौभाग्याचे लेणे बॅँक, पतपेढ्या तसेच सावकाराकडे गहाण ठेवून भांडवल उपलब्ध करीत उत्तम प्रतीचा भाजीपाला पिकविला, मात्र त्या भाजीपाल्याला योग्य तो दर मिळत नसल्यामुळे बियाणे, औषधे तसेच घेतलेले कर्ज या लॉकडाउनमुळे कसे चुकवायचे असा प्रश्न परिसरातील शेतकºयांसमोर उभा टाकला आहे.