बाणगंगानगरच्या शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 12:02 AM2020-02-15T00:02:05+5:302020-02-15T00:02:25+5:30

ओझर येथील बाणगंगानगरमधील तरुण शेतकरी रामेश्वर उत्तमराव कदम (४९) यांनी कर्जबाजारी- पणामुळे आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

Farmer suicide of Banganganagar | बाणगंगानगरच्या शेतकऱ्याची आत्महत्या

बाणगंगानगरच्या शेतकऱ्याची आत्महत्या

Next

ओझर : येथील बाणगंगानगरमधील तरुण शेतकरी रामेश्वर उत्तमराव कदम (४९) यांनी कर्जबाजारी- पणामुळे आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शेतीत काही पिकत नाही आणि पिकले तरी त्याला दर मिळत नाही. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून कदम हे पिंपळगावमधील डाळींब व्यापाºयाकडे काम करत होते.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, ओझरजवळील बाणगंगानगर गंगापूर डावातट कालवा चारी नं. १६ येथील रामेश्वर उत्तमराव कदम यांनी बुधवारी (दि. १२) पिंपळगाव बसवंत चिंचखेड रोडलगत असलेल्या आझादनगर येथील राहत्या घरात कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. कदम यांच्यावर कॅनरा बॅँक ओझरचे तीन लाख, ओझर विविध कार्यकारी सोसायटीचे दीड लाख व ओझर नागरी सहकारी पतसंस्था ओझर यांचे एक लाख तसेच सावकारी कर्ज होते. सोसायटी आणि बँकेकडून थकीत कर्जाच्या परतफेडीसाठी तगादा सुरू होता. यामुळे ते अस्वस्थ होते. या वैफल्यातूनच त्यांनी जीवनयात्रा संपविल्याचे सांगितले जाते. कदम यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.

Web Title: Farmer suicide of Banganganagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.