शेतकऱ्याने साकारले शेतोपयोगी यंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 00:40 IST2020-07-17T21:42:38+5:302020-07-18T00:40:55+5:30
येवला : तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील शेतकरी अनिल भोरकडे यांनी कपाशी, मका, सोयाबीन या पिकांमध्ये फवारणी, पेरणी, पाळी, कोळपणी, ...

शेतकऱ्याने साकारले शेतोपयोगी यंत्र
येवला : तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील शेतकरी अनिल भोरकडे यांनी कपाशी, मका, सोयाबीन या पिकांमध्ये फवारणी, पेरणी, पाळी, कोळपणी, खुरपणी या आंतरमशागतीसाठी मिनी ट्रॅक्टर यंत्र तयार केले आहे. सदर यंत्राचे उद्घाटन पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते व तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, पंचायत समिती कृषी अधिकारी वास्ते, कृषी सहाय्यक आहेर, डॉ. सुरेश कांबळे यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. खरिपात प्रामुख्याने मका, कपाशी व सोयाबीन पिके घेतली जातात.
यंत्रासाठी लागणाºया साहित्याची कोपरगाव, येवला, राहाता व अहमदनगर येथून शोधाशोध करून जुळवाजुळव केली. सुटीच्या दिवशी शेतातील कामं करून राहिलेल्या वेळेत यंत्राचं काम सुरू झालं आणि दोन-तीन महिन्यात यंत्र तयार झाल. सदर यंत्राचे पहिले प्रात्याक्षिक आपल्याच शेतात घेतले. ते यशस्वी झाल. या यंत्रासोबत वखर, फन व बळी साहित्य असून, त्याद्वारे कपाशी, मका या पिकांत वखर, फन व औषध फवारणी करता येते. सदर यंत्रासाठी यांना साधारणत: २८ ते ३० हजार रुपये खर्च आला.
- अनिल भोरकडे, शेतकरी, पिंपळगाव जलाल
पिकांची खुरपणी मजुरांअभावी घरीच करावी लागते व अंतरमशागतीसाठी बैलांची गरज भासते. अनिल भोरकडे यांच्याकडे बैलजोडी नाही. आताच्या परिस्थितीत चांगल्या बैलजोडीला ६० ते ७० हजार रु पये लागतात व बैलजोड ठेवलीच त्यांच्या सोड-बांध व चारा-पाण्याचा प्रश्न येतो. मग यावर उपाय काय, असा विचार करताना भोरकडे यांना सोशल मीडियावर यंत्र बघण्यात आले.
यावर पिटर इंजिनवर चालणारी अनेक प्रकारची यंत्र त्यांनी पाहिली. लहानपणापासून यंर खोल-फिटिंगची खूप आवड असल्याने अशा प्रकारचं यंत्र घरी तयार करता येईल का, असा विचार भोरकडे यांचे डोक्यात आला. घरात १ जून पिटर इंजिन होत ते वापरून त्यांनी प्रयोग करायला सुरु वात केली.