शेततळ्यात पडून शेतकºयाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 02:05 IST2018-03-08T02:05:17+5:302018-03-08T02:05:17+5:30
सिन्नर : शहा येथे शेततळ्यात पडल्याने शेतकºयाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि. ५) सकाळी ११च्या सुमारास घडली. तुषार रावसाहेब जाधव (२८) असे मृत शेतकºयाचे नाव असून, कोळगावमाळ रस्त्यावरील शेततळ्यात डोंगळा टाकण्यासाठी तो गेला होता.

शेततळ्यात पडून शेतकºयाचा मृत्यू
ठळक मुद्देतुषार रावसाहेब जाधव (२८) असे मृत शेतकºयाचे नाव तुषार याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन वर्षाचा मुलगा असा परिवार
सिन्नर : शहा येथे शेततळ्यात पडल्याने शेतकºयाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि. ५) सकाळी ११च्या सुमारास घडली. तुषार रावसाहेब जाधव (२८) असे मृत शेतकºयाचे नाव असून, कोळगावमाळ रस्त्यावरील शेततळ्यात डोंगळा टाकण्यासाठी तो गेला होता. बराच वेळ होऊनही तुषार न आल्याने त्याचा शोध घेण्यात आला. त्यावेळी शेततळ्याच्या कडेला त्याची दुचाकी व चपला दिसल्या. त्याच्या गळ्यातील तुळशीची माळ पाण्यावर तरंगत असल्याचे दिसल्यानंतर संशय आला. त्यानंतर शेततळ्यात शोध घेण्यात आल्यानंतर तुषारचा मृतदेह मिळून आला. तुषार याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.