रोटरमध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 00:57 IST2020-01-19T00:18:38+5:302020-01-19T00:57:28+5:30
मळगाव येथील भोसले वस्ती-जवळ रोटरने मशागत करीत असताना अडकलेली घाण बाहेर काढण्यासाठी गेलेल्या अमोल विठ्ठल भोसले या शेतकºयाचा रोटरमध्ये अडकून जागीच मृत्यू झाला.

रोटरमध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू
मालेगाव : मळगाव येथील भोसले वस्ती-जवळ रोटरने मशागत करीत असताना अडकलेली घाण बाहेर काढण्यासाठी गेलेल्या अमोल विठ्ठल भोसले या शेतकºयाचा रोटरमध्ये अडकून जागीच मृत्यू झाला. शनिवारी ही दुर्दैवी घटना घडली. अमोल हा शेतजमिनीवर ट्रॅक्टरने (क्र. एमएच ४१ एएस ०२१८) मशागत करीत होता. यावेळी ट्रॅक्टर व रोटर सुरूच होते. रोटरमध्ये अडकून त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.