शहरं
Join us  
Trending Stories
1
सुभेंदु अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजन दावा
2
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
3
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
4
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
5
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
6
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
7
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
8
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
9
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
10
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
11
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
12
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
13
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
14
शेअर बाजारात 'या' ५ शेअर्सचा धुमाकूळ! पाचच दिवसांत दिला ४५ ते ८० टक्क्यांपर्यंत परतावा; बघा लिस्ट
15
हंटाव्हायरस बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
16
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
17
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
18
Video - आता हे काय नवीन? "आणखी अभ्यास केला असता तर..."; लेकाला ४९९/५०० गुण मिळूनही आई नाराज
19
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
20
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कारुण्याचा मांडला बाजार : गिरीधर पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 00:41 IST

अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढल्याने खरिपाच्या सोयाबीन, द्राक्ष, कांदा, बाजरी, ज्वारी, कापूस यांसोबतच पालेभाज्या, फळभाज्या आदी पिकांचे अगणित नुकसान होऊन शेतकरी कोलमडला आहे.

अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढल्याने खरिपाच्या सोयाबीन, द्राक्ष, कांदा, बाजरी, ज्वारी, कापूस यांसोबतच पालेभाज्या, फळभाज्या आदी पिकांचे अगणित नुकसान होऊन शेतकरी कोलमडला आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी प्रयत्न अपेक्षित असताना सध्या राजकारण्यांनी शेतकऱ्यांच्या कारुण्याचा बाजार मांडला आहे, तर प्रशासनाकडून अतिवृष्टीग्रस्त गावांचे सरसकट पद्धतीने अंदाजे पंचनामे करून भ्रामक आकडेवारी दिली जात आहे. त्यामुळे प्रत्यक्षात झालेले नुकसान हे शासकीय आकडेवारीच्या कितीतरी पटीने अधिक असल्याचे या आकड्यांची पडताळणी केल्यास समोर येईल, असे मत शेतकºयांना उद्ध्वस्त करणाºया या संकटाबाबत कृषी अर्थशास्त्राचे तज्ज्ञ डॉ. गिरीधर पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले आहे.
अतिवृष्टीमुळे वाया गेलेल्या खरिपाचा शेती क्षेत्रावर काय परिणाम होईल?
मान्सूनच्या आगमनानंतरही काही भागांत दुष्काळाच्या झळा कायम होत्या. चांगला पाऊस झाला तिथे हाती आलेले पीक परतीच्या पावसाने पूर्ण वाया गेल्याने शेतकरी आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या खचला आहे. शेतकºयांवर ओढावलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात सरकारकडून मिळणारी तुटपुंजी मदतही राज्यात सरकारच नसल्याने अद्याप मिळू शकलेली नाही. शासकीय यंत्रणातर केवळ सातव्या वेतन आयोगासाठीच काम करतात की काय? असा प्रश्न निर्माण होतो. अतिवृष्टी बाधीत गावांमध्ये सरसकट नुकसान दाखविल्याने प्रत्यक्ष वास्तविकता समोर येत नाही.
अवकाळी संकटांवर मात करण्यासाठी शेतकºयांनी काय करणे गरजेचे आहे?
शेतकºयांना मदत करण्याच्या प्रयत्नांमध्ये शेतकरी वगळता इतर सारे घटक सक्षम व पुष्ठ होत जातात. शेतकरी तसाच राहतो आणि इतर घटक मात्र त्याच्या कारुण्याचा बाजार मांडत त्यांचा स्वार्थ साधत राहतात. त्यामुळे अशा संकटांवर मात करण्यासाठी शेतकºयांनी राजकीय भूमिका घेणे गरजेचे आहे. त्यांनी आपला शत्रू आणि मित्र ओळखण्याची गरज आहे. राजकारणासह, बाजार समिती, अडते, व्यापारी यासर्वांच्या बाबतीत हाच निकष लावण्याची गरज आहे.
बाजार समिती, व्यापारी, अडते, बँकांकडून होणाºया अडवणुकीमुळे  शेतकरी पुरता  त्रस्त असतांना  नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी कोलमडला आहे. मदतीला  कोणीही नाही.  त्यामुळे शेतक-यांनी आपला शत्रू आणि मित्र कोण ते
ओळखून प्रत्येकाला योग्यवेळी चोख उत्तर द्यावे.
सावरण्यासाठी रब्बीवर आशा
अवकाळी पावसामुळे हंगामपूर्व द्राक्षबागांचे नुकसान झाले असून, नियमित हंगामातील बागांचे रोगांपासून संवर्धन करण्याचे आव्हान आहे. अवकाळीमुळे झालेले नुकसान कोणत्याही स्थितीत भरून येऊ शकत नाही. खरिपाचा कांदा वाया गेल्याने कांदा उत्पादकांंची संपूर्ण भिस्त उन्हाळ कांद्यावर असणार आहे. गहू, हरबरा, ज्वारीसारख्या रब्बी पिकांमधून सावरण्याची अपेक्षा आहे. परतीच्या पावसामुळे जमिनीची ओल वाढली असून, वातावरण सामान्य राहिल्यास रब्बीचे पीक चांगले येईल.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती