ब्राह्मणगावच्या शेतकऱ्याने तोडली द्राक्षबाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 15:55 IST2021-01-22T15:55:20+5:302021-01-22T15:55:48+5:30
ब्राह्मणगाव : गेल्या चार - पाच वर्षांपासून अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व सततच्या नैसर्गिक संकटांना वैतागून येथील द्राक्ष उत्पादक योगेश अरुण अहिरे यांनी पाच एकर द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवून तिला बुडासकट काढून टाकली. ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष पिकावर मोठी अवकळा आली असून, परिसरातील बऱ्याच द्राक्ष बागा तोडल्या जात आहेत.

ब्राह्मणगावच्या शेतकऱ्याने तोडली द्राक्षबाग
चार - पाच वर्षांपासून शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. तरीही शेतकरी मोठी आर्थिक झळ सोसत शेती करीत आहेत. मात्र, सध्या ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, दाट धुके, अती ऊन, त्यातच पिकांवरील महागडी औषधे, वाढती शेतमजुरी, पिकांना खर्चापेक्षा मिळणारा कमी भाव याला कंटाळून येथील चंद्रकांत गोविंद अहिरे, योगेश अरुण अहिरे यांनी आपल्या द्राक्ष बागा कुऱ्हाडीने बुडासकट तोडून टाकल्या.
सध्या तर सर्वच पिकांना नैसर्गिक संकटांचा त्रास वाढला असून, कांदा पिकालाही अनेक रोगांनी ग्रासले आहे. गव्हाचे क्षेत्र पूर्णपणे घटले असून, कांदा पिकाकडून शेतकऱ्यांच्या आर्थिक अपेक्षा होत्या. मात्र, त्यालाही ढगाळ वातावरणाचा फटका बसत आहे.