दहिवाळ येथे शेतकऱ्यास मारहाण

By Admin | Updated: August 4, 2015 23:05 IST2015-08-04T23:04:01+5:302015-08-04T23:05:47+5:30

दहिवाळ येथे शेतकऱ्यास मारहाण

The farmer beat up at Dhiwal | दहिवाळ येथे शेतकऱ्यास मारहाण

दहिवाळ येथे शेतकऱ्यास मारहाण


मालेगाव : तालुक्यातील दहिवाळ येथे कुरापत काढून वयोवृदध शेतकऱ्यास मारहाण करणाऱ्या सात जणांविरूद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मागील आठवड्यात गुरूवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास ही घटना
घडली.
दौलत धोंडू पवार यांनी कालरात्री पोलिसात फिर्याद दिली. दौलत पवार हे त्यांच्या दहिवाळ शिवारातील शेतात जेसीबी यंत्राने काम करीत असताना निवृत्ती रामचंद्र पवार, अशोक भिला पवार, सोमनाथ बापू पवार, शिवराम पवार, बापू तुळशीराम पवार, भिला पवार, कैलास शिवराम पवार अशा सात जणांनी गैरकायद्याची मंडळी जमवून दौलत पवार यांना तुम्ही आम्हाला प्लॉट द्या नाहीतर जेसीबी बाजूला करा अशी कुरापत काढून शिविगाळ, मारहाण दमदाटी करून दौलत पवार यांच्या डोक्यावर हातापायावर मारहाण करून जखमी केले. म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: The farmer beat up at Dhiwal