लासलगाव कोविड सेंटरमधून सात रुग्णांना निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 23:57 IST2020-06-28T23:49:26+5:302020-06-28T23:57:38+5:30
लासलगाव येथील कोविड सेंटरमधून ठणठणीत बरे झालेल्या सात कोरोना बाधित रु ग्णांना निरोप देण्यात आला. त्यात निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील पाच तर चांदोरी येथील दोघांचा समावेश आहे.

लासलगाव कोविड सेंटरमधून सात रुग्णांना निरोप
लासलगाव : येथील कोविड सेंटरमधून ठणठणीत बरे झालेल्या सात कोरोना बाधित रु ग्णांना निरोप देण्यात आला. त्यात निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील पाच तर चांदोरी येथील दोघांचा समावेश आहे. कोरोना बाधित रु ग्णांची संख्या १०१ वर पोहचली असून त्यातील ४५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांची घरवापसी झाली आहे . आतापर्यंत ११ कोरोनाबधितांचा मृत्यू झाला असून ४५ जणांवर लासलगाव ,पिंपळगाव आणि नाशिक येथील शासकीय तसेच खासगी रु ग्णालयात उपचार सुरू आहेत.
सदर रु ग्णांना निर्जंतुकीकरण केलेल्या रु ग्णवाहिकेतून घरी सोडण्यात आल्याची माहिती कोविड सेंटर प्रमुख डॉ. राजाराम शेंद्रे यांनी दिली. यावेळी लासलगाव ग्रामीण रु ग्णालय अधीक्षक डॉ. अहिरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळकृष्ण अहिरे, तनपुरे, ज्ञानेश्वर शिंदे, रामू जाधव, संतोष निरभवणे, शिंदे , दत्तू शिंदे, गणेश भवर, दिलीप जेऊघाले, परिचारिका सोनवणे, कोळी आदी आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.