शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावकरांना प्रतीक्षा पूरपाण्याची

By admin | Updated: August 5, 2014 01:57 IST

मालेगावकरांना प्रतीक्षा पूरपाण्याची

 

राजीव वडगे

संगमेश्वरमालेगाव शहरवासीयांना पावसाबरोबरच मोसम नदीच्या पूरपाण्याची प्रतीक्षा असून, मालेगावकर नागरिक चातकाप्रमाणे पूरपाण्याची वाट बघत आहेत.मालेगाव शहरातून वाहणाऱ्या मोसम नदीला सध्या गटार गंगेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मोसम नदीचे पात्र पाणवेलींनी आच्छादिलेले दिसून येत असून, शहरातील सांडपाणी मोठ्या प्रमाणावर नदीत सोडण्यात आले आहे. त्याशिवाय विविध झाडे- झुडपे मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. घाण, कचरा नदीपात्रात टाकण्यात येत असल्याने नदीला गटारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे मच्छरांची मोठ्या प्रमाणावर उत्पत्ती झाली आहे. दुर्गंधीमुळे शहरवासीयांचे आरोग्य मोठ्या प्रमाणावर धोक्यात आले आहे. सायंकाळनंतर तर डास, मच्छरांचा मोठा उच्छाद असतो. नदी किनारी राहणारे नागरिक यामुळे हैराण झाले आहेत. याकडे महानगरपालिका प्रशासनाचे वा लोकप्रतिनिधींचे सपशेल दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना कोणी वालीच राहिला नाही.दोन दिवसांपूर्वी मोसम नदीत हरणबारी धरणाचे पाणी सोडण्यात आल्याची दवंडी महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने दिली. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र नदीला पूरपाणी काही आलेच नाही. पूरपाण्यामुळे नदीतील घाण कचरा वाहून जाईल. नदीपात्र स्वच्छ होईल या आशेने नागरिक पूरपाण्याकडे डोळे लावून बसले आहेत. आरोग्यदायी ठरणारे पूरपाणी लवकर येवो यासाठी मालेगावकर देवाकडे प्रार्थना करीत आहेत. महानगरपालिका प्रशासन निष्क्रिय झाल्याने निसर्ग तरी आपल्या मदतीला धावून येईल या आशेवर सध्या नागरिक आहेत. (वार्ताहर)